मोठी बातमी: महेंद्रसिंह धोनी निवृत्ती न घेता, टी-२० विश्वचषकापर्यंत खेळण्याची शक्यता 

MS Dhoni, T20 World Cup 2020: एका नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्टनुसार, महेंद्रसिंह धोनी हा आयसीसी टी-२० विश्वचषक २०२० मध्ये खेळू शकतो.

 Dhoni_Rishabh_IANS
धोनी निवृत्ती न घेता, टी-२० विश्वचषकापर्यंत खेळणार?  |  फोटो सौजन्य: IANS

थोडं पण कामाचं

  • एमएस धोनी टी-२० विश्वचषक २०२० पर्यंत खेळू शकतो. 
  • सूत्रांच्या माहितीनुसार, टीमला असं वाटतं की, धोनीने टी-२० विश्वचषक खेळावा
  • वेस्टइंडिज दौऱ्यावर जाण्यास धोनीने स्वत: दिला नकार 

मुंबई: भारतीय क्रिकेट निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी वेस्ट इंडिज दौऱ्यावर विकेटकीपर आणि फलंदाज रिषभ पंत याला तिन्ही प्रकारातील भारतीय संघात स्थान दिलं आहे. पंतला तीनही प्रकारात घेण्यात आलं आहे कारण की, भारताचा अनुभवी विकेटकीपर महेंद्रसिंह धोनीने या दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतला आहे. धोनीने या दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतल्याने त्याच्या निवृत्तीची आता चर्चा सुरु झाली आहे. पण सूत्रांच्या माहितीनुसार, पंतला टी-२० विश्वचषक लक्षात घेऊन संघात निवडण्यात आलं आहे. पण टीम मॅनेजमेंटला असंही वाटतं की, धोनीने यादरम्यान निवृत्ती घेऊ नये. टीम मॅनेजमेंटचं असं मत आहे की, जर धोनीने निवृत्ती घेतली आणि जर पंत एखाद्या सामन्यात दुखापतग्रस्त झाला तर विश्वचषकात भारतीय संघ थोडासा कमकुवत होऊ शकतो. ती जागा भरून काढणं हे मुश्किल होऊ शकतं. 

सूत्र आयएएनएसला असं म्हणाला की, 'धोनी आपलं संघातली स्थान आणि भूमिका या दोन्ही गोष्टी चांगल्या जाणून आहे. सगळेच जण त्याच्या निवृत्तीबाबत बोलत आहेत. पण तो कधीही कोणत्याही वादावर प्रतिक्रिया देत नाही. मला माहिती आहे की, आपण सगळेच त्याच्या नैतिकतेबाबत खूप काही जाणून आहोत.' 

'जेव्हा टीम मॅनेजमेंट टी-२० विश्वचषक स्पर्धा लक्षात ठेऊन पंतला घडवत आहे तेव्हा त्यांना असंही वाटतं की, धोनी एक मेंटॉर म्हणून संघात असला पाहिजे. जेव्हाही संघाला त्याची गरज पडेल तेव्हा तो तिथे हजर असेल.' 

सूत्र पुढे असंही म्हणाले की, 'आपण पाहा आणि सांगा की, जर पंत दुखापतग्रस्त झाला तर त्याचा पर्याय आपल्याकडे कोण असेल. खरं सांगू तर दुसरीकडे आपल्याकडे जी नावं आहेत ते धोनीचा मुकाबला करण्याच्या क्षमतेचे नाहीत. पण ही गोष्ट कुणीही नाकारू शकत नाही की, पंत टीमचं भविष्य आहे. त्याला सर्व प्रकारात वापरलं गेलं पाहिजे. पण धोनीचं मार्गदर्शन आणि उपलब्धतता हे देखील खूप गरजेचं आहे.' 

दरम्यान, एमके प्रसाद असं म्हणाले होते की, पंतला आम्ही सर्व प्रकारच्या फॉर्मेटसाठी खेळवत आहोत. तसंच धोनीला निर्णय घ्यायचा आहे की, त्याला कधी निवृत्त व्हायचं आहे. 'निवृत्तीचा संपूर्ण निर्णय हा वैयक्तिक असेल. धोनीसारखा दिग्गज क्रिकेटर फार चांगल्या पद्धतीने जाणतो की, त्याला कधी निवृत्ती घ्यायची आहे. पण जिथवर भविष्याचा विचार करायचा झाल्यास ते निवड समितीच्या हातात आहे. पण धोनी या मालिकेसाठी उपलब्ध नसेल.' 

प्रसाद असंही म्हणाले होते की, 'आम्ही विश्वचषकापर्यंत एक रोड मॅप तयार केला आहे. तसेच आमच्या पुढे देखील योजना तयार आहेत. आम्ही सध्या पंतसारख्या खेळाडूंचं कौशल्य आणि चांगलं करण्याचा प्रयत्न करत आहोत. पंतने काहीही चुकीचं केलेलं नाही की, त्याला आम्ही संघात समाविष्ट करु नये.'

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
मोठी बातमी: महेंद्रसिंह धोनी निवृत्ती न घेता, टी-२० विश्वचषकापर्यंत खेळण्याची शक्यता  Description: MS Dhoni, T20 World Cup 2020: एका नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्टनुसार, महेंद्रसिंह धोनी हा आयसीसी टी-२० विश्वचषक २०२० मध्ये खेळू शकतो.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...