'WE MISS YOU Dhoni': वेलिंगटनमध्ये भासते एमएस धोनीची कमरता, फॅन्सने झळकावले बॅनर 

MS Dhoni banner in Wellington: भारत आणि न्यूझीलंड दरम्यान वेलिंग्टनमध्ये खेळविण्यात आलेल्या चौथ्या टी-२० सामन्यावेळी भारतीय फॅन्स एक बॅनर लावला होता. त्याने जगभरातील सर्व फॅन्सचे ध्यान आकर्षित केले. 

ms dhoni presence is missing in wellington as fans show we miss you dhoni banner cricket news in marathi tcri
'WE MISS YOU Dhoni': वेलिंगटनमध्ये भासते एमएस धोनीची कमरता, फॅन्सने झळकावले बॅनर  

थोडं पण कामाचं

  • एमएस धोनीने वेलिंग्टनमध्ये फॅन्सने लावले बॅनर 
  • एमएम धोनीने २०१९ वर्ल्ड कपनंतर सेमीफायनलनंतर एकही सामना नाही खेळला
  • भारताने चौथ्या टी २० मध्ये न्यूझीलंडला दिली मात 

वेलिंग्टन :  भारतीय क्रिकेट संघाचा टी २० सामन्यात २०१९ नंतर चांगली कामगिरी होत नव्हती. टीम इंडिया विशेष करून लक्ष्याचे रक्षण करताना काही सामने टीम इंडियाने गमावले आहेत. पण या वर्षी भारतीय टीमने फटाफट क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. सर्वात प्रथम विराट कोहलीच्या नेतृत्त्वातील भारतीय टीमने श्रीलंकेला आपल्या घरात २-० ने पराभूत केले त्यानंतर या लयीला न्यूझीलंडमध्येही कायम राखले. पाच सामन्यांच्या सिरीजमध्ये भारताने ४-० अशी आघाडी घेतली आहे. 

भारत आणि न्यूझीलंडच्या वेलिंग्टनमध्ये खेळण्यात आलेल्या चौथ्या टी २० सामन्यात भारतीय फॅन्सने एक बॅनर झळकावला होता. त्याने जगभरातील क्रिकेट रसिकांचे लक्ष्य वेधले आहे. भारतीय टीमच्या समर्थकांनी आम्ही तुला मिस करतोय धोनी असा बॅनर झळकावला. बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर हा बॅनर झळकावलेला फोटो ट्विट केला आहे. त्यावर लिहिले आहे की फॅन्सच्या गोष्टी 


ब्रेकवर आहे धोनी 

टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी गेल्या अनेक काळापासून क्रिकेटपासून दूर आहे. त्याने २०१९ च्या वर्ल्ड कप सेमी फायनलनंतर एकही सामना खेळलेला नाही. या नंतर अनेकवेळा त्याचा पुनरागमनाच्या बातम्या आल्या. पण त्याने एकही सामना खेळला नाही. धोनीच्या भविष्यावर अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित झाले. पण अजूनही त्याने निवृत्तीची घोषणा केलेली नाही. त्याने सांगितले की त्याला जानेवारी २०२० पर्यंत याबाबत प्रश्न विचारू नका. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...