IPL Retention: CSKसाठी धोनीने दिले हे बलिदान...

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Dec 01, 2021 | 13:28 IST | टाइम्स नाऊ मराठी

IPL 2022 Retention: महेंद्र सिंग धोनी आयपीएल २०२२मध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना दिसणार आहे. सीएसकेच्या मेगा लिलावच्या आधी आलेल्या रिटेंशन लिस्टने हे स्पष्ट केले आहे.

ms dhoni
IPL Retention: CSKसाठी धोनीने केला इतका मोठा त्याग 
थोडं पण कामाचं
  • धोनी दुसऱ्या स्थानावरील रिटेन खेळाडू ठरला.
  • पहिल्या स्थानावर सीएसकेने रवींद्र जडेजाला रिटेन केले.
  • धोनीने यासाठी मोठा त्याग केला आणि आपले वेतन घटवून कमी सॅलरीमध्ये टीमशी जोडून राहण्याचा निर्णय घेतला

मुंबई: आयपीएल २०२२(IPL 2022)साठी चेन्नई सुपर किंग्सकडून (CSK)जारी करण्यात आलेल्या रिटेंशन लिस्टनंतर(IPL 2022 Retention List) हे स्पष्ट झाले आहे की महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) लीगच्या पुढील हंगामात खेळत आहे. हे आधीपासूनच ठरलेले होते की सीएसके धोनीला नक्की रिटेन करणार. मात्र माहीने आधीच सीएसकेच्या टीम मॅनेजमेंटला सांगितले होते की संघाने त्याच्यावर जास्त पैसे खर्च करून त्याला रिटेन करू नकेय. त्याच्या मते युवा खेळाडूंना संधी दिली पाहिजे. जेव्हा सीएसकेची यादी जाहीर झाली तेव्हा असेच दिसले. धोनी दुसऱ्या स्थानावरील रिटेन खेळाडू ठरला. तर पहिल्या स्थानावर सीएसकेने रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) ला रिटेन केले. म्हणजे धोनीने जे संघाला सांगितले होते तसेच झाले. MS Dhoni scarifies this thing for Chennai super kings in ipl 2022

रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) सारखा क्रिकेटर चेन्नई सुपर किंग्समध्ये कायम राहिला. धोनीने यासाठी मोठा त्याग केला आणि आपले वेतन घटवून कमी सॅलरीमध्ये टीमशी जोडून राहण्याचा निर्णय घेतला. पहिल्या नंबरवर रिटेन झाल्याने जडेजाला भारीभक्कम रक्कम म्हणजेच तब्बल १६ कोटी रूपये मिळाले. तर धोनीला १२ कोटी रूपयांना रिटेन केले. याआधी धोनीला सॅलरी म्हणून १५ कोटी मिळत होते. म्हणजेच धोनीला आयपीएल २०२२मध्ये ३ कोटी रूपये कमी मिळणार. 

धोनीने जडेजासाठी दिले बलिदान

यावरून स्पष्ट होते की धोनीला उगाचच मोठा कर्णधार का म्हटले जाते. त्याला माहीत आहे की त्याची ताकद आता कमी होत आहे. तो भविष्यासाठी नवी लीडरशिप तयार करू इच्छितो. याच कारणामुळे त्याने जडेजाला वरचे स्थान दिले. धोनी आणि जडेजा व्यतिरिकित् सीएसकेने मोईन अली(८ कोटी) आणि ऋतुराज गायकवाड(६ कोटी) यांना रिटेन केले. 

जडेजा भविष्यातील कर्णधार

सीएसकेच्या नजरेतून उचललेले हे पाऊल बरोबर आहे. कारण ४०वे वर्ष धोनीचे आयपीएल २०२२ हे अखेरीच असू शकतो. कारण या लीगचे आयोजन भारतात होत आहे आणि रिटेशन लिस्ट जारी होण्याआधी धोनीने एका कार्यक्रमा म्हटले होते की त्याला आपली अखेरची टी-२० चेन्नईमध्ये खेळायची आहे. आता हे पुढील वर्षी असेल अथवा पाच वर्षांनी असेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी