पत्नी साक्षीसोबत मजेदार क्षण घालवताना धोनीचा हा अंदाज तुम्ही पाहिलाय का?

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jun 02, 2021 | 14:57 IST | टाइम्स नाऊ मराठी

MS Dhoni and Sakshi Dhoni Viral Video: एमएस धोनी सोशल मीडियावर कमी प्रमाणात अॅक्टिव्ह असतो मात्र त्याची पत्नी सतत पोस्ट आणि व्हिडिओ शेअर करत असते. 

ms dhoni and sakshi
पत्नी साक्षीसोबत मजेदार क्षण घालवताना धोनीचा असा अंदाज 

थोडं पण कामाचं

  • धोनी आणि साक्षी यांनी २०१०मध्ये लग्न केले होते
  • दोघांना एक मुलगी आहे जिचे नाव झिवा आहे.
  • साक्षी अनेकदा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असते. 

मुंबई:  भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि विकेटकीपर फलंदाज एमएस धोनीने(ms dhoni) साक्षीसोबत(sakshi dhoni) २०१०मध्ये लग्नगाठ बांधली होती. दोघांना एक मुलगी आहे जिचे नाव झिवा आहे. जिवाचा जन्म २०१५मध्ये झाला होता. धोनी आणि साक्षी यांची गणना देशातील सर्वात पॉप्युलर कपलमध्ये केली जाते. धोनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फार कमी सक्रिय असतो मात्र त्याची पत्नी सतत फोटो पोस्ट करत असते.(ms dhoni share funny moments with wife sakshi)

धोनी आणि साक्षी आपल्या वेगळ्या स्वभावामुळे सर्वात पसंतीचे आणि प्रेमळ जोडप्यांपैकी एक आहेत. धोनी खूप शांत आहे आणि मैदानाच्या बाहेर कॅमेऱ्यासमोर येण्यास मात्र धोनी लाजतो. तर दुसरीकडे साक्षी मात्र कॅमेऱ्यासमोर येण्यास अजिबात लाजत नाही. साक्षी अनेकदा धोनीची टिंगल करत असते. साक्षीने या गोड क्षणांचे फोटोही शेअर केले आहेत. यात कॅप्टन कूल म्हणजेच धोनीचा हा क्यूट अंदाज तुम्हाला पाहायला भेटतो. 

साक्षीने हा फोटो इन्स्टाग्रामवर २०२० कोविड लॉकडाऊनदरम्यान शेअर केला होता. फोटोमध्ये धोनी आरामात पहुडला आहे आणि व्हिडिओ गेम खेळताना दिसत आहे. साक्षी या दरम्यान धोनीचे ध्यान आकर्षित करण्यासाठी त्याच्या पायाचा अंगठा चावण्याा प्रयत्न करत आहे. साक्षीने पोस्टसोबत कॅप्शन दिले की ती वेळ जेव्हा तुम्ही मि. स्वीटीचे ध्यान लक्ष आकर्षित करत आहात. व्हिडिओ गेम विरुद्ध पत्नी. 

धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या आरामादरम्यान पत्नी साक्षी आणि आपल्या कुटुंबियांसोबत तसेच मित्रांसोबत क्वालिटी टाईम घालवतो. २०२०च्ा सुरूवातीला साक्षीने धोनीचा हा क्यूट व्हिडिओ शेअर केला होता. यात तो नवी दिल्लीच्या ताज पॅलेस येथून चेक आऊट करत होता. जेव्हा धोनी चेकआऊट करत असतो तेव्हा त्यांना सतत स्वीटी म्हणते. 


हे स्टार कपल्सचे सर्वात प्रेमळ फोटोंपैकी एक आहे. भारताचा माजी कर्णधार आपल्या पत्नीचे शू बकल नीट करताना दिसत आहे. साक्षीने हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले होते की तु  शूचे पैसे दिले आहे त्यामुळे तुलाच ते बांधावे लागतील. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी