धोनीच्या तोंडातून रक्ताची उलटी? फोटो होतोय व्हायरल, जाणून घ्या सत्य

MS Dhoni: टीम इंडियाचा विकेटकीपर महेंद्रसिंग धोनी याचा एक फोटो सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये धोनीच्या तोंडातून रक्त निघत असल्याचं दिसत आहे. जाणून घ्या या फोटो मागचं सत्य...

Mahendra Singh Dhoni
महेंद्रसिंग धोनी  |  फोटो सौजन्य: Twitter

बर्मिंघम: टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी याने यंदाच्या वर्ल्ड कप 2019 मध्ये आपल्या प्रदर्शनाने अनेकांना नाराज केलं. ज्या पद्धतीने धोनी बॅटिंग करत आहे तसं प्रदर्शन त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये आपल्याला कधीच पहायला मिळालं नाही. त्यामुळे माजी क्रिकेटर्स आणि त्याचे चाहते सुद्धा धोनीच्या खेळीवर प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत. त्यातच इंग्लंड विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये टीम इंडियाला 31 रन्सने पराभवाचा सामना करावा लागला आणि धोनीवर अनेकांनी टीका केली. सोशल मीडियात धोनीला युजर्सने जोरदार ट्रोलही केलं. या मॅचमध्ये धोनीने 32 बॉल्समध्ये 41 रन्सची इनिंग खेळली होती मात्र, टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात अपयश आलं होतं.

त्यातच आता इंग्लंड विरुद्धच्या मॅचमधील महेंद्रसिंग धोनीचा एक फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये धोनी थुंकताना दिसत आहे आणि त्याच्या तोंडातून रक्त बाहेर पडत असल्याचं दिसत आहे. त्यावेळी या गोष्टीकडे कुणाचंही लक्ष गेलं नाही की, धोनीला एखाद्या गंभीर समस्येचा सामना करावा लागत आहे. या मॅचमध्ये धोनीच्या अंगठ्याला दोनवेळा दुखापत झाली. पहिल्यांदा विकेट कीपिंग करताना तर दुसऱ्यावेळी बॅटिंग करताना दुखापत झाली होती. या फोटो तेव्हाचा आहे जेव्हा धोनी बॅटिंग करत होता आणि त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली. त्यावेळी धोनीने रक्त येत असलेला अंगठा तोंडात टाकला. त्यामुळे त्याच्या तोंडात रक्त गेलं आणि हे रक्त थुंकतानाचा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. 

 

 

धोनीचा हा फोटो सोशल मीडियात जोरदार व्हायरल होण्यास सुरूवात झाली. त्यानंतर धोनीचं कौतुकही होऊ लागलं. सोशल मीडिया युजर्स धोनीच्या जबाबदारीचं कौतुक करत असल्याचं दिसत आहेत.

महेंद्रसिंग धोनी याने वर्ल्ड कप 2019 मध्ये आतापर्यंत सात मॅचेस खेळल्या आहेत. या सात मॅचेसमध्ये त्याने 223 रन्स केले असून सर्वोत्तम स्कोअर 56 रन्सवर नॉट आऊट असा आहे. या सात मॅचेसमध्ये धोनीने एकच हाफसेंच्युरी केली आहे. तर 19 फोर आणि 4 सिक्सर लगावले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
धोनीच्या तोंडातून रक्ताची उलटी? फोटो होतोय व्हायरल, जाणून घ्या सत्य Description: MS Dhoni: टीम इंडियाचा विकेटकीपर महेंद्रसिंग धोनी याचा एक फोटो सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये धोनीच्या तोंडातून रक्त निघत असल्याचं दिसत आहे. जाणून घ्या या फोटो मागचं सत्य...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola