MS Dhoni News:दुखापतीने त्रस्त आहे महेंद्रसिंग धोनी, महागडे नव्हे तर २० रूपयांचे औषध घेतोय

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jul 01, 2022 | 18:20 IST | टाइम्स नाऊ मराठी

MS Dhoni: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी गेल्या एका महिन्यांपासून दुखापतीने त्रस्त आहे. मात्र याच्या उपचारासाठी तो कोणत्याही महागड्या डॉक्टरांकडे गेलेला नाही. 

ms dhoni
दुखापतीने त्रस्त धोनी, महागडे नव्हे तर २० रूपयांचे घेतोय औषध 
थोडं पण कामाचं
  • रांचीपासून ७० किमी दूरर लापुंगच्या कातिमगकेलमध्ये वावा गलतमी धाममध्ये वैद्य वंदन सिंह खेरवार असतात
  • धोनी त्यांच्याकडे उपचार करायला जात आहे.
  • वंदनने सांगितले की माजी कर्णधार धोनी गेल्या एख महिन्यांपासून ४ दिवसांसाठी त्याच्याकडे जडीबूटीवाला औषध घेण्यासाठी येतो. 

रांची: भारतीय टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने(ms dhoni) २०१९मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर धोनी केवळ आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून(chennai super kings) खेळताना दिसत आहे. याशिवाय धोनी बराच काळ आपले शहर रांचीमध्ये घालवतो. नुकताच त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता यात धोनी मित्राचा वाढदिवस साजरा करत होता. आता माजी कर्णधार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. MS Dhoni took treatmen at vaidya

अधिक वाचा - मुसळधार पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी साचले पाणी

गुडघ्याच्या त्रासाने आहे हैराण

महेंद्रसिंग धोनी गेल्या काही काळापासून गुडघ्याच्या दुखण्याने त्रस्त आहे. याच्या उपचारासाठी त्याने महागड्या हॉस्पिटलमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. तो झारखंडच्या एका जंगल स्थित एका छोट्याशा आश्रमातून करत आहे. तेथील वैद्य धोनीला औषध देत आहे. धोनी दर चार दिवसांनी औषधासाठी वैद्याकडे जात आहे. तो ४० रूपये देतो औषधासाठी २० रूपये आणि २० रूपये फीस. जेव्हा धोनी तेथे पोहोचतो सेल्फी घेण्यासाठी त्याच्याकडे गर्दी होते. 

रांचीपासून ७० किमी दूर

रांचीपासून ७० किमी दूरर लापुंगच्या कातिमगकेलमध्ये वावा गलतमी धाममध्ये वैद्य वंदन सिंह खेरवार असतात. धोनी त्यांच्याकडे उपचार करायला जात आहे. वंदनने सांगितले की माजी कर्णधार धोनी गेल्या एख महिन्यांपासून ४ दिवसांसाठी त्याच्याकडे जडीबूटीवाला औषध घेण्यासाठी येतो. 

अधिक वाचा - Neeraj: नीरज चोप्राने पुन्हा केली कमाल, जिंकले मेडल

आयपीएलमध्ये खेळू शकतो

४० वर्षीय महेंद्रसिंग धोनी पुढील वर्षीहीआयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. यावर्षी चेन्नई सुपर किंग्सचा संघ प्लेऑफमध्येही पोहोचू शकला नव्हता. हंगामाच्या सुरूवातीला धोनीने नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या जागी जडेजाकडे नेतृत्व देण्यात आले होते मात्र हंगामाच्या शेवटी पुन्हा धोनीकडे नेतृत्व देण्यात आले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी