धोनीच्या निवृत्तीच्या प्रश्नावर एमएसके प्रसाद म्हणतात की... 

वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठी टीम इंडियाची आज निवड करण्यात आली. निवड समितीच्या बैठकीनंतर बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी धोनीच्या निवृत्तीच्या प्रश्नावर मोठं वक्तव्य केलं आहे. 

msk prasad
धोनीच्या निवृत्तीच्या प्रश्नावर एमएसके प्रसाद म्हणतात की...   |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या प्रश्नावर एमएसके प्रसाद यांचं मोठं वक्तव्य
  • धोनीच्या निवृत्तीच्या अफवा प्रसाद यांनी फेटाळल्या
  • महान खेळाडूला माहित असं की कधी निवृत्त व्हायचे, प्रसाद यांचं वक्तव्य

मुंबईः  बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी रविवारी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड केली आहे. यावेळी झालेल्या बैठकीनंतर प्रसाद यांनी टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबद्दलच्या अफवा फेटाळून लावल्या आहेत. यामुळे वर्ल्ड कपनंतर धोनीच्या निवृत्तीच्या प्रश्नांना आता पूर्णपणे पूर्णविराम लागला आहे. ३ ऑगस्टपासून वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठी आज टीम इंडियाची निवड करण्यात आली. यावेळी पत्रकार परिषदेत जेव्हा एमएसके प्रसाद यांच्या निवृत्तीबाबत विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी म्हटलं की, धोनीसारखा महान खेळाडूला चांगलं माहित आहे कधी निवृत्ती घ्यायची. 

प्रसाद यांनी म्हटलं की, निवृत्ती घेण्याचा निर्णय पूर्णपणे व्यक्तिगत आहे. एमएस धोनीसारखा महान खेळाडूला चांगलं माहित असतं की कधी निवृत्ती घ्यायची. टीमसाठी भविष्यात काय योजना असतील आणि कशापद्धतीनं रोडमॅप असेल. हे पूर्णपणे निवड समितीवर अवलंबून असते. 

एमएसके प्रसाद यांनी धोनी पुढे म्हटलं की, धोनी या सिरीजसाठी उपलब्ध नाही आहे. मात्र वर्ल्ड कपपर्यंत आमच्या काही वेगळ्या योजना आणि रोडमॅप होते. त्याच मार्गावर चालत आम्ही नवीन गोल आणि नव्या योजना निश्चित केल्या आहेत. आता आम्ही पंतला जास्तीत जास्त संधी देऊन त्याला चांगला क्रिकेटर होताना बघू इच्छित आहे. सध्यातरी आमचा हाच प्लान आहे. रिषभ पंतला तिन्ही फॉर्मेटच्या टीममध्ये पहिल्यांदा संधी मिळाली आहे. तसंच टेस्ट टीममध्ये रिद्धीमान साहाची सुद्धा वापसी झाली आहे.  पंतबद्दल प्रसाद यांनी म्हटलं की, आमच्या भविष्यातील योजनांमध्ये पंत सहभागी आहे. आम्ही त्याला सुधारण्यासाठी शक्य तितक्या संधी देऊ इच्छित आहे.

भारतीय क्रिकेट टीमचा वेस्ट इंडिज दौरा ३ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. १ महिने चालणाऱ्या या दौऱ्यात टीम इंडिया तीन टी-20 मॅचेस, 3 वन-डे मॅचेस आणि दोन टेस्ट मॅचेस खेळणार आहे. हा दौरा ३ सप्टेंबरला समाप्त होईल. पहिलं म्हटलं जातं होतं की, विराट कोहलीला वर्ल्ड कपनंतर आराम दिला जाईल. मात्र विराट कोहली तिन्ही फॉर्मेटमध्ये टीम इंडियाची कमान सांभाळताना दिसेल. तर रोहित शर्माला सुद्धा तिन्ही फॉर्मेटमध्ये टीममध्ये जागा मिळाली आहे. रोहित शर्मा मर्यादित ओव्हरसाठी व्हाईस कॅप्टन असेल. टेस्ट टीमचं व्हाईस कॅप्टन अजिंक्य रहाणेला बनवण्यात आलं आहे. 

जसप्रीत बुमराहला वनडे आणि टी-२० सिरीजसाठी आराम देण्यात आला आहे. टीम इंडियात शिखर धवनचं पुनरागमन झालं आहे तर हार्दिक पांड्याला आराम देण्यात आला आहे.  टी-20 क्रिकेट टीममध्ये राहुल चहल या नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे. आयसीसी वर्ल्ड कप 2019 संपल्यानंतर टीम इंडियाचा हा पहिलाच दौरा आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
धोनीच्या निवृत्तीच्या प्रश्नावर एमएसके प्रसाद म्हणतात की...  Description: वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठी टीम इंडियाची आज निवड करण्यात आली. निवड समितीच्या बैठकीनंतर बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी धोनीच्या निवृत्तीच्या प्रश्नावर मोठं वक्तव्य केलं आहे. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...