Cricket News : ऐन चाळीशीत वेगवान गोलंदाजाचे निधन

mumbai former pacer rajesh verma dies due to cardiac arrest : मुंबई संघाकडून क्रिकेट खेळलेल्या राजेश वर्मा याचे अकाली निधन झाले. तो ४० वर्षांचा होता.

mumbai former pacer rajesh verma dies due to cardiac arrest
Cricket News : ऐन चाळीशीत वेगवान गोलंदाजाचे निधन  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • Cricket News : ऐन चाळीशीत वेगवान गोलंदाजाचे निधन
  • हृदयविकाराच्या झटक्याने निधन
  • राजेशला ओळखणाऱ्यांनी ही घटना कळताच शोक व्यक्त केला

mumbai former pacer rajesh verma dies due to cardiac arrest : मुंबई संघाकडून क्रिकेट खेळलेल्या राजेश वर्मा याचे अकाली निधन झाले. तो ४० वर्षांचा होता. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले. वेगवान गोलंदाजी करणारा राजेश वर्मा २००६-०७च्या रणजी विजेत्या मुंबई संघाचा सदस्य होता. राजेशचा सहकारी आणि माजी क्रिकेटपटू भाविन ठक्कर याने ही दुःखद माहिती दिली.

कारकिर्दीत सात प्रथम श्रेणी सामने खेळलेला राजेश वर्मा २००६-०७च्या रणजी विजेत्या मुंबई संघाचा सदस्य होता. त्याने २००२-०३ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पंजाब विरुद्ध २००८ मध्ये तो ब्रेबॉन स्टेडियमवर शेवटचा सामना खेळला. राजेशने सात प्रथम श्रेणी सामने खेळून २३ बळी घेतले. तसेच ११ लिस्ट ए सामने खेळून २० बळी घेतले. 

राजेशच्या अकाली निधनामुळे मुंबईच्या क्रिकेट वर्तुळाला धक्का बसला. राजेशला ओळखणाऱ्यांनी ही घटना कळताच शोक व्यक्त केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी