IPL 2022: मुंबई इंडियन्स या ३ खेळाडूंना ठेवू शकते कायम, याचा पत्ता होणार कट

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Oct 29, 2021 | 13:50 IST | टाइम्स नाऊ मराठी

Mumbai indians retain: आयपीएलच्या १४व्या हंगामात सगळ्यात यशस्वी टीम मुंबई इंडियन्सचा महत्त्वाचा खेळाडू हार्दिक पांड्या बाहेर होऊ शकतो.

hardik pandya
IPL 2022: मुंबई इंडियन्स या ३ खेळाडूंना ठेवू शकते कायम 
थोडं पण कामाचं
  • आयपीएलच्या आगामी सत्रात १० संघ असतील.
  • या वर्षी डिसेंबरमध्ये हा लिलाव होईल.
  • मुंबई इंडियन्सने २०२२मध्ये संघात कायम ठेवणाऱ्या खेळाडूंची यादी बनवली आहे.

मुंबई: टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्याला(hardik pandya) मुंबई इंडियन्सकडून(mumbai indians) लिलावाच्या शर्यतीत टाकण्याची शक्यता आहे. कारण पाच वेळा चॅम्पियन ठरलेल्या संघाने आयपीएल २०२२(Ipl 2022)मध्ये संघात कायम ठेवणाऱ्या खेळाडूंची यादी बनवली आहे. आरपी-एसजी आणि सीव्हीसी द्वारे लखनऊ(lucknow) आणि अहमदाबाद(ahmedabad) फ्रेंचायजी खरेदीसाठी आयपीएलच्या आगामी सत्रात १० संघ असतील. या वर्षी डिसेंबरमध्ये हा लिलाव होईल. ज्यामुळे अनेक संघांतील खेळाडू बदलू शकतात. mumbai indians can retain this 3 player in team for ipl 2022

आयपीएलच्या १४व्या हंगामात सगळ्यात यशस्वी टीम मुंबई इंडियन्सचा महत्त्वाचा खेळाडू हार्दिक पांड्या बाहेर होऊ शकतो. गेल्या काही काळापासून तो केवळ फलंदाजी करत आहे. खेळाडूंना रिटेन करण्याशी संबधित आयपीएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले , मला वाटते की बीसीसीआयकडे राईट टू मॅचचा फॉर्म्युला असेल. जर आयटीएम नसेल तर चार खेळाडूंना रिटेन करण्याची सूट मिळू शकते. रोहित शर्मा आणि भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ही त्यांची पहिली पसंती असेल. 

किरेन पोलार्ड ही संघासाठी तिसरी पसंती असेल. या टीमच्या ताकदीचे प्रदर्शन निरंतर आहे. ज्याचे हे तीनही खेळाडू स्तंभ आहेत. त्यामुळे सध्याच्या परिस्थिती हार्दिकला संघात कायम ठेवण्याची शक्यता १० टक्के आहे. त्याने जर टी-२० वर्ल्डकपमध्ये पुढील काही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करू शकतो मात्र त्यानंतरही त्याला संघात कायम ठेवण्याची शक्यता कमी आहे. जर चार खेळाडू रिटेन झाले अथवा एक आरटीएम आहे तर सूर्यकुमार यादव अथवा इशान किशन या स्थानासाठी मोठे दावेदार असतील. हार्दिकबाबतचा पूर्ण निर्णय पूर्णपणे क्रिकेटवर आधारित आहे. कारण तो आधीसारखा ऑलराऊंडर राहिलेला नाही. 

आयपीएलमध्ये दोन नव्या संघांची घोषणा

आयपीएलची नवी टीम: संजीव गोयनका यांच्या मालकीच्या आरपीएसजी ग्रुपने लखनऊ फ्रँचायझीचे मालकी हक्क मिळवले. RPSG समूहाने 7000 कोटींची गुंतवणूक करून बोली जिंकली. लखनऊ हे आयपीएल संघाचे शहर होईल. खाजगी इक्विटी फर्म सीव्हीसी कॅपिटलने दुसऱ्या फ्रँचायझीचे मालकी हक्क मिळवले. त्यांनी 5200 कोटींची बोली लावली. बीसीसीआयच्या एका सूत्राच्या हवाल्याने पीटीआयने ही माहिती दिली आहे. दोन्ही संघांची एकूण 12,200 कोटी रुपयांना विक्री झाली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी