चेन्नई : जर कोणी तुम्हाला आयपीएलच्या ( IPL)इतिहासातील सर्वात यशस्वी संघाचे नाव विचारत असेल तर ते सांगण्यास कदाचित एका सेकंदापेक्षा जास्त वेळ लागणार नाही. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) लीगमध्ये आपले वर्चस्व असे बनवले आहे की त्यांच्या आणि उर्वरित संघांमधील फरक खूपच मोठा झाला आहे. यामागे संतुलित संघ आणि जबरदस्त कर्णधार आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे मुंबईने जिंकलेल्या पाच विजेते पदांपैकी रोहितने त्यांना विजेतेपद मिळवून दिले आहे. त्याहूनही आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे रोहित शर्माने (Rohit Sharma)2013 मध्ये मुंबई इंडियन्स संघाची धुरा सांभाळली होती. ज्या आठ मोसमांत त्याने संघाचे नेतृत्त्व केले आहे त्यापैकी पाचमध्ये त्याने विजेतेपद पटकावले आहे. या लिलावात कोणत्या खेळाडूंनी मुंबई इंडियन्सवर बाजी मारली हे जाणून घेऊ या. लिलावात कायम ठेवलेल्या आणि खरेदी केलेल्या मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंची संपूर्ण यादी पुढील प्रमाणे.
रिटेन खेळाडूः रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, आदित्य तारे, सौरभ तिवारी, जसप्रीत बुमराह, धवल कुलकर्णी, ट्रेंट बोल्ट, जयंत यादव, सूर्यकुमार यादव, कॅरेन पोलार्ड, क्रुणाल पंड्या, ख्रिस लिन, राहुल चहर, हार्दिक पंड्या, अनमोलप्रित सिंग, मोहसीन खान, अनुकूल रॉय, ईशान किशन.