Mumbai indians: या दोन खेळाडूंना मुंबई करणार नाही रिटेन

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 26, 2021 | 13:05 IST | टाइम्स नाऊ मराठी

Mumbai Indians in ipl 2022: क्रिकबझच्या रिपोर्टनुसार हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या आयपीएलचा नवा संघ अहमदाबादकडून खेळताना दिसू शकतात.

mumbai indians
Mumbai indians: या दोन खेळाडूंना मुंबई करणार नाही रिटेन 
थोडं पण कामाचं
  • मुंबई इंडियन्स हार्दिक आणि कृणाल पांड्याला रिटेन करणार नाही
  • मुंबई इंडियन्स आयपीएल २०२२मध्ये रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि किरेन पोलार्ड यांना रिटेून करू शकतात.
  • हार्दिक आणि कृणालने मुंबई इंडियन्ससाठी चांगली कामगिरी केली आहे.

मुंबई:  इंडियन प्रीमीयर लीगच्या(indian premier league) आठ जुन्या फ्रेंचायझी ३० नोव्हेंबरला रिटेन(retain) केलेल्या खेळाडूंची घोषणा करणार आहे. सर्वच संघानी रिटेन केल्या जाणाऱ्या खेळाडूंची यादी बनवली आहे. मात्र ही यादी अद्याप जाहीर झालेली नाही. यातच हार्दिक पांड्या(hardik pandya) आणि कृणाल पांड्या(krunal pandya) हे दोन भाऊ आयपीएलच्या पुढील हंगामात कदाचित मुंबई इंडियन्ससाठी(mumbai indians) खेळणार नाही तर नव्या फ्रेंचायझीसाठी खेळताना दिसू शकतात. असं मानलं जात आहे की मुंबई इंडियन्स हार्दिक आणि कृणाल पांड्याला रिटेन करणार नाही. पांड्या ब्रदर्सने आपली बॅट आणि बॉलने मुंबई इंडियन्सला अनेक सामने जिंकून दिले आहे. मात्र फ्रेंचायजीमधून यांचा रस्ता वेगळा होऊ शकतो. Mumbai indians may be not retain hardik and krunal pandya for ipl 2022

क्रिकबझच्या रिपोर्टनुसार हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या आयपीएलचा नवा संघ अहमदाबादकडून खेळताना दिसू शकतात. दोन्ही भाऊ अहमदाबाद फ्रेंचायजीच्या संपर्कात आहेत. मुंबई इंडियन्स आयपीएल २०२२मध्ये रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि किरेन पोलार्ड यांना रिटेून करू शकतात. त्यांच्याशिवाय रिटेन होणाऱ्या खेळाडूंमध्ये इशान किशनच्या नावाचाही समावेश आहे. गुजराती कनेक्शन असण्याने आणि राज्यात त्यांचे जास्त चाहते असल्याने अहमदाबाद टीम मॅनेजमेंट २०२२मध्ये आपल्या संघात घेऊ शकतात. 

हार्दिक आणि कृणालने मुंबई इंडियन्ससाठी चांगली कामगिरी केली आहे. गेल्या हंगामात दोघांची कामगिरी निराशाजनक राहिली होती. हार्दिकने १४व्या हंगामातील सामन्यांमध्ये मिळून १२७ धावा केल्या होत्या. गेल्या दोन हंगामापासून तो आयपीएलमध्ये गोलंदाजीही करत नाही आहे. हार्दिकने आयपीएलमध्ये आतापर्यंत ९२ सामन्यांमध्ये चार अर्धशतकांच्या मदतीने १४७६ धावा केल्या आहेत. सोबतच ४२ विकेटही घेतल्या आहेत. तर कृणाल पांड्याने गेल्या हंगामातील १३ सामन्यांमध्ये १४३ धावा केल्यात. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत ८४ सामन्यांमध्ये ११४३ धावा केल्या आहेत आणि सोबतच ५१ विकेट घेतल्या आहेत. 

राहुलचा पंजाबला बाय बाय

इंडियन एक्सप्रेसच्या एका रिपोर्टनुसार लोकेश राहुल आयपीएलची नवी फ्रेंचायजी लखनऊसोबत जोडण्यास सज्ज आहे. आयपीएल २०२१मध्य राहुलची कामगिरी धमाकेदार राहिली होती. त्याने १३ सामन्यांमध्ये ६२.६०च्या सरासरीने ६२६ धावा केल्या होत्या. आयपीएल २०२१मध्ये राहुलने ६ अर्धशतके ठोकली होती. पंजाब किंग्स राहुलला रिटेन करण्याचा प्रयत्न करेल मात्र त्याआधीच राहुलच्या निर्णयाने त्यांना जबरदस्त झटका बसला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी