Rohit Sharma: नागपूरमध्ये जन्मलेल्या मुंबईकर रोहित शर्माचं शिक्षण आहे एवढं!

Rohit Sharma College: नागपूरमध्ये दुसरा टी-20 सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार आहे. पण याच सामन्याआधी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याचं नागपूरशी एक खास कनेक्शन आहे. जाणून घ्या त्याविषयी.

 mumbaikar rohit sharma born in nagpur what is education team indias captain
नागपूरमध्ये जन्मलेल्या मुंबईकर रोहित शर्माचं शिक्षण आहे एवढं! (फाइल फोटो) 
थोडं पण कामाचं
  • भारत वि. नागपूर यांच्यात दुसरा टी-20 सामना
  • भारताचा कर्णधार रोहित शर्मा याचं आहे नागपूरशी खास कनेक्शन
  • रोहित शर्मा बारावीनंतर कॉलेजमध्येच गेला नाही

Rohit Sharma Education: नागपूर: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Ind Vs Aus) यांच्यात आज (23 सप्टेंबर) दुसरा टी-20 सामना (T-20 Match) नागपूरमध्ये (Nagpur) रंगणार आहे. याच नागपूरमधील एक नवं कनेक्शन आता समोर आलं आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हा पक्का मुंबईकर आहे. पण असं असलं तरीही रोहित शर्मा याचा जन्म मात्र नागपूरचा आहे. नागपूरमधील बनसोड येथे रोहितचा जन्म झाला होता. सध्या रोहित शर्मा हा टीम इंडियाचा स्टार खेळाडू आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का की, त्याचं शिक्षण नेमकं किती झालंय? चला तर याचबाबत जाणून घेऊया सविस्तर. (mumbaikar rohit sharma born in nagpur what is education team indias captain)

क्रिकेटर रोहित शर्मा याच जन्म 30 एप्रिल 1987 रोजी झाला होता. रोहितचा जन्म हा एका सामान्य कुटुंबात झाला होता. ज्यांची आर्थिक परिस्थिती ही खूपच बेताची होती. रोहितचे वडील गुरुनाथ शर्मा हे एका कंपनीत केअर टेकर म्हणून काम करत होते. मात्र, असं असलं तरी त्यांनी आपल्या मुलाच्या शिक्षणात किंवा त्याच्या खेळात अजिबात खंड पडू दिला नाही. 

अधिक वाचा: Asia Cup 2022: श्रीलंका विरुद्धच्या मॅचमध्ये दिनेश कार्तिकला का खेळवलं नाही? रोहित शर्माने म्हटलं...

रोहित शर्माने कितवीपर्यंत घेतलं शिक्षण?

रोहितने आपलं शालेय शिक्षण हे मुंबईतील अवर लेडी ऑफ वेलंकन्नी हायस्कूलमधून पूर्ण केलं. त्यानंतर त्याने मुंबईतीलच स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल अॅण्ड ज्युनिअर महाविद्यालयात प्रवेश घेतला. जिथे त्याने फक्त बारावीपर्यंत शिक्षण घेतलं. पण क्रिकेट खेळण्यासाठी पूर्ण वेळ मिळायला हवा म्हणून रोहित शर्मा याने 12वी नंतर कॉलेजलाच गेला नाही. 

रोहित शर्मा हा सुरुवातीला नागपूरमध्ये राहत होता. मात्र, नंतर त्यांचं संपूर्ण कुटुंब हे मुंबईत आलं होतं. तेव्हा रोहित हा अवघ्या दीड वर्षाचा होता. सुरुवातीला रोहित आणि त्याच्या भावाला बोरिवलीमध्ये त्याच्या आजी-आजोबांकडे ठेवण्यात आलं होतं. इथेच तो गल्ली क्रिकेट खेळत-खेळत मोठा झाला होता. त्यानंतर तो शालेय पातळीवरील क्रिकेटच्या स्पर्धा खेळू लागला.

अधिक वाचा: Team India ची नवी जर्सी लॉन्च; आता दिसणार 'मेन इन ब्लू' या अवतारात

यावेळी रोहितच्या शाळेच क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांनी रोहितमधील क्रिकेटची प्रतिभा ओळखली. सुरुवातीला रोहित शर्मा हा ऑफ स्पिनर गोलंदाज म्हणून शाळेच्या टीममध्ये खेळायचा. 1999 साली 12 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत त्याने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे दिनेश लाड यांनी रोहित शर्माची फलंदाजीची क्षमता लक्षात घेऊन त्याला त्याच पद्धतीने कोचिंग सुरु केलं. यामुळेच पुढच्या काही काळात स्फोटक फलंदाज अशी रोहित शर्मा याची ओळख सर्वत्र तयार झाली. 

रोहित शर्माची कारकीर्द

रोहित शर्माने आतापर्यंत 233 वनडे सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. ज्यामध्ये त्याने तब्बल 9376 धावा केल्या आहेत. आतापर्यंतच्या वनडे कारकिर्दीत रोहितने 29 शतकं झळकावली आहेत तर 45 अर्धशतकांचा देखील समावेश आहे. 

अधिक वाचा: Ind vs Aus: ...म्हणे यांना T-20 वर्ल्डकप जिंकायचाय, ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला लोळवलं

तर टी-20 फॉर्मेटमध्ये रोहितने 137 सामन्यात 3631 धावा केल्या आहेत. यातील महत्त्वाची बाब म्हणजे आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये चार शतकं झळकवणारा रोहित शर्मा हा एकमेव फलंदाज आहे. अशी कामगिरी आतापर्यंत एकाही फलंदाजाला करता आलेली नाही. तसंच रोहितने 28 अर्धशतकं देखील ठोकली आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी