२ वर्षानंतर मैदानावर उतरण्यास तयार मुरली विजय, दिनेश कार्तिकशी खास नाते

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jun 22, 2022 | 17:24 IST | टाइम्स नाऊ मराठी

मुरली विजयने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या विधानात TNPLच्या माध्यमातून कमबॅक करणार असल्याचे सांगितले.

murali vijay
२ वर्षानंतर मैदानावर उतरण्यास तयार मुरली, कार्तिकशी खास नाते 
थोडं पण कामाचं
  • भारतीय संघाचे शेड्यूल्ड सध्या खूप बिझी आहे.
  • मात्र यातच एक खेळाडू असा आहे जो दीर्घ प्रतीक्षेनंतर मैदानावर पुनरागमन करण्यास तयार आहे.
  • खरंतर आम्ही मुरली विजयबद्दल बोलत आहोत.

मुंबई: सध्या टीम इंडिया नुकतीच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिका खेळली. यानंतर आता टीम इंडिया आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध मालिका खेळणार आहे. भारतीय संघाचे शेड्यूल्ड सध्या खूप बिझी आहे. मात्र यातच एक खेळाडू असा आहे जो दीर्घ प्रतीक्षेनंतर मैदानावर पुनरागमन करण्यास तयार आहे. खरंतर आम्ही मुरली विजयबद्दल बोलत आहोत. सलामी फलंदाज मुरली विजयने २०२०मध्ये शेवटचा व्यवसायिक क्रिकेट सामना खेळला होता. यानंतर तो मैदानापासून दूर होता. मुरी २३ जूनपासूनस सुरू होत असलेल्या तामिळनाडू प्रीमियर लीगपासून कमबॅक करत आहे. Murali vijay all set to comeback in cricket ground

अधिक वाचा- मोठी बातमी ! आमदार चंद्रकांत पाटीलही फुटले?

खाजगी जीवनात होता व्यस्त

मुरली विजयने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या विधानात TNPLच्या माध्यमातून कमबॅक करणार असल्याचे सांगितले. या स्पर्धेत तो रूबी त्रिची वॉरियर्सकडून खेळताना दिसणार आहे. खेळापासून इतका काळ दूर राहिलेल्या भारतीय ओपनरने सांगितले, मला खेळायचे होते. मात्र काही दुखापतींमुळे मी खेळू शकलो नाही. माझे खाजगी जीवनही खूप धावपळीचे जात होते मला ते संथ गतीने करायचे होते. मला बघायचे होते की मी व्यक्तीगत रूपात कुठे उभा आहे आणि याच कारणामुळे मला ब्रेकची गरज होती. माझे नशीब चांगले की तामिळनाडू प्रीमियर लीगने माझी स्थिती समजली आणि मला पुनरागमनसाठी चांगला प्लॅटफॉर्म दिला. 

कसोटी संघाचा मुख्य भाग होता विजय

एक वेळ अशी होती की भारतीय कसोटी संघाचा तो प्रमुख सदस्य होता. २००८मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपला पहिला कसोटी सामना खेळला होता. ३८ वर्षीय फलंदाजाने भारतासाठी एकूण ६१ कसोटी सामने खेळले आहेत आणि एकूण ३९८२ धावा केल्यात. १०५ डावांमध्ये त्याने १२ शतके आणि १५ अर्धशतके ठोकली आहेत.

याशिवाय त्याने १७ वनडेमध्ये ३३९ धावा आणि ९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत १६९ धावा केल्यात. त्याने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भले आपली ओळख बनवली नसेल मात्र कसोटीत त्याने भारताला अनेक सामने जिंकून दिलेत. २०१४मध्ये इंग्लंडविरुद्ध लॉडर्सच्या मैदानावर मिळालेल्या ऐतिहासिक विजयात विजयने ९५ धावांची खेळी केली होती. त्याने २०१८मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर शेवटचा कसोटी सामना खेळला होता. मात्र खराब फॉर्ममुळे त्याला संघाबाहेर काढण्यात आले. 

अधिक वाचा - नाकातूनच नव्हे तर गुदद्वारातूनही घेता येणार श्वास

कार्तिकशी खास नाते

सध्याच्या काळात टीम इंडियामध्ये जबरदस्त खेळी करणाऱ्या दिनेश कार्तिकशी मुरली विजयचे खास नाते आहे. खरंतर हे दोन्ही खेळाडू तामिळनाडूसाठी डोमेस्टिक स्तरावर क्रिकेट खेळतात आणि राष्ट्रीय संघासाठीही अनेक सामने एकत्र खेळले आहेत. याशिवाय कार्तिकच्या खाजगी जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास त्याचे पहिले लग्न निकिताशी झाले होते मात्र हळू हळू निकिता आणि मुरली विजय एकमेकांच्या प्रेमात पडले. इतके की निकिता मुरली विजयपासून प्रेग्नंटही होती. अखेर निकिता आणि कार्तिकने घटस्फोट घेतला आणि मुरली विजयशी लग्न केले. कार्तिकने स्क्वॉश प्लेयर दीपिका पल्लिकलशी लग्न केले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी