VIDEO: कार्तिकचे नाव घेऊन चिडवत होता प्रेक्षक, मुरली विजयने स्टँडमध्ये घुसून केली मारहाण

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jul 29, 2022 | 13:32 IST | टाइम्स नाऊ मराठी

एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे यात मुरली विजय मैदानाबाहेर येत चाहत्याशी काही कारणावरून भांडताना दिसत आहे मात्र काही वेळातच तो परत गेला. आजकाल पाहायला मिळते की मैदानावरील अनेक प्रेक्षक त्याला दिनेश कार्तिकच्या नावाने चिडवतात. 

murali vijay
कार्तिकच्या नावाने चिडवणाऱ्या फॅन्सशी विजयने केली हाणामारी 
थोडं पण कामाचं
  • २४ जुलैला झालेल्या एका सामन्यात भारताचा एकेकाळचा स्टार खेळाडू राहिलेल्या मुरली विजय चाहत्यासोबत मैदानातच भिडला.
  • हा सामना मदुरै पँथर्स विरुद्ध रुबी त्रिची वॉरियर्स यांच्यात रंगला होता.
  • पँथर्सने या सामन्यात रूबी त्रिची वॉरियर्सला ३६ धावांनी हरवले होते.

मुंबई:  तमिलनाडु प्रीमियर लीग 2022(Tamil Nadu Premier League 2022)मध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी उडाली आहे. २४ जुलैला झालेल्या एका सामन्यात भारताचा एकेकाळचा स्टार खेळाडू राहिलेल्या मुरली विजय(murali vijay) चाहत्यासोबत मैदानातच भिडला. हा सामना मदुरै पँथर्स विरुद्ध रुबी त्रिची वॉरियर्स यांच्यात रंगला होता.(Murali vijay video viral on social media during match)

अधिक वाचा - 'मुख्यमंत्र्यांचा पायागुण वाईट असेच म्हणावे लागेल'

पँथर्सने या सामन्यात रूबी त्रिची वॉरियर्सला ३६ धावांनी हरवले होते. मात्र हा क्रिकेट सामना वेगळ्याच कारणाने चर्चेचा ठरला. वॉरियर्स टीमच्या या सामन्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या सामन्यात मुरली विजय प्लेईंग ११चा भाग नव्हता मात्र काही काळासाठी तो मैदानावर फिल्डिंगसाठी आला होता. 

एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे यात तो मैदानाबाहेर येऊन चाहत्यासोबत कोणत्या तरी मुद्दयावरून भांडताना दिसत आहे. मात्र काही वेळाने तो परत जातो. आपल्या खाजगी आयुष्याबद्दल ऐकून कदाचित मुरली विजयला राग आला असावा आणि तो त्या प्रेक्षकाकडे गेला. मुरली काही वेळ या प्रेक्षकासोबत बोलत होता मात्र नंतर ही बाब हाणामारीवर आली. मुरली विजयने दीर्घकाळानंतर क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन केले आहे.

अधिक वाचा - 'कॉफी विथ करण'मध्ये अनन्या-विजयची उपस्थिती

कार्तिकशी खास नाते

सध्याच्या काळात टीम इंडियामध्ये जबरदस्त खेळी करणाऱ्या दिनेश कार्तिकशी मुरली विजयचे खास नाते आहे. खरंतर हे दोन्ही खेळाडू तामिळनाडूसाठी डोमेस्टिक स्तरावर क्रिकेट खेळतात आणि राष्ट्रीय संघासाठीही अनेक सामने एकत्र खेळले आहेत. याशिवाय कार्तिकच्या खाजगी जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास त्याचे पहिले लग्न निकिताशी झाले होते मात्र हळू हळू निकिता आणि मुरली विजय एकमेकांच्या प्रेमात पडले. इतके की निकिता मुरली विजयपासून प्रेग्नंटही होती. अखेर निकिता आणि कार्तिकने घटस्फोट घेतला आणि मुरली विजयशी लग्न केले. कार्तिकने स्क्वॉश प्लेयर दीपिका पल्लिकलशी लग्न केले.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी