Suryakumar Yadav:माझा 4 नंबर धोक्यात आहे...या क्रिकेटरची बॅटिंग पाहून सूर्या घाबरला

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Oct 05, 2022 | 15:22 IST | टाइम्स नाऊ मराठी

IND vs SA: टीम इंडियाचा धुरंधर फलंदाज सूर्यकुमार यादव द. आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात 5व्या स्थानावर फलंदाजीसाठी आला आणि 8 धावा करून परतला. 

suryakuamar yadav
माझा 4 नंबर धोक्यात,या क्रिकेटरची बॅटिंग पाहून सूर्या घाबरला 
थोडं पण कामाचं
  • भारतीय संघाला इंदूरमध्ये खेळवण्यात आलेल्या मालिकेच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी20 सामन्यात 49 धावांनी पराभव सहन करावा लागला
  • रोहित शर्माने टॉस जिंकला आणि द. आफ्रिकेला पहिल्यांदा फलंदाजीसाठी बोलावले.
  • पाहुण्या संघाने रिलीच्या नाबाद 100 आणि क्विंटन डी कॉकच्या 68 धावांच्या खेळीच्या जोरावर तीन बाद 227 धावा केल्या.

मुंबई: स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवला(suryakumar yadav) द. आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेत प्लेयर ऑफ दी सीरिज(player od the series) निवडण्यात आले. त्याने मालिकेतील सुरूवातीच्या दोन सामन्यांमध्ये अर्धशतक ठोकले. इंदूरमध्ये खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी20 सामन्यात तो पाचव्या स्थानावर फलंदाजीसाठी आला आणि आठ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.यातच तो म्हणाला की त्याच्या चौथ्या नंबरला धोका आहे. my 4th number is in trouble says surya after seeing Dinesh Karthik batting

अधिक वाचा - मुंबईत कार अपघातात 5 ठार 8 जखमी

तिसऱ्या टी-20मध्ये पराभव मात्र मालिकेत विजय

भारतीय संघाला इंदूरमध्ये खेळवण्यात आलेल्या मालिकेच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी20 सामन्यात 49 धावांनी पराभव सहन करावा लागला. भारताचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकला आणि द. आफ्रिकेला पहिल्यांदा फलंदाजीसाठी बोलावले. पाहुण्या संघाने रिलीच्या नाबाद 100 आणि क्विंटन डी कॉकच्या 68 धावांच्या खेळीच्या जोरावर तीन बाद 227 धावा केल्या. यजमान संघाने आव्हानाचा पाठलाग करताना 18.3 ओव्हरमध्ये सर्व विकेट गमावत केवळ 178 धावा केल्या. 

कार्तिकची धमाल

या सामन्यात चौथ्या स्थानावर दिनेश कार्तिकला उतरवण्यात आले. विराट कोहली आणि केएल राहुलला या सामन्यात आराम देण्यात आला होता. यामुळे ऋषभ पंतने सलामीवीराची भूमिका निभावली. सूर्यकुमार पाचव्या स्थानावर फलंदाजीसाठी आला. कार्तिकने 219च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. त्याने 21 बॉलमध्ये चार चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 46 धावा ठोकल्या. 

4थ्या स्थानाला धोका

सूर्यकुमार यादवने सामन्यानंतर सांगितले, ज्या पद्धतीने कार्तिकने फलंदाजी केली त्यामुळे चौथे स्थान धोक्यात आहे. तो पुढे म्हणाला, सामन्यात माझ्या खेळाबाबत मी असाच विचार केली की बस मला आनंद घ्यायचा आहे. मला एक पार्टनरशिप बनवायची होती. मात्र आज काही करू शकलो नाही. डीकेने ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्यावरून मला असे वाटते की माझा  नंबर 4 धोक्यात आहे. 

अधिक वाचा - महिला आजही घरात कैद, दलितांवर आजही अन्याय - मोहन भागवत

मॅन ऑफ दी सीरिज सूर्या

सूर्यकुमार यादवने द. आफ्रिकेविरुद्धच्या संपूर्ण मालिकेत 119 धावा केल्या आणि त्याला प्लेयर ऑफ दी सीरिज निवडण्यात आले. पहिल्या सामन्यात त्याने नाबाद 50 धावा ठोकल्या. दुसऱ्या गुवाहाटीतील सामन्यात 61 धावांची खेळी केली. तिसऱ्या सामन्यात त्याला केवळ 8 धावा करता आल्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी