'रावळपिंडी एक्सप्रेस' थांबणार, शोएब अख्तर गुडघे प्रत्यारोपण करणार

My running days are over, says Shoaib Akhtar before going for knee replacement रावळपिंडी एकस्प्रेस या नावाने प्रसिद्ध असलेला पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर निवृत्त झाल्यानंतर त्याच्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत राहिला. पण आता शोएब अख्तर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.

My running days are over, says Shoaib Akhtar before going for knee replacement
शोएब अख्तर गुडघे प्रत्यारोपण करणार 
थोडं पण कामाचं
  • शोएब अख्तर गुडघे प्रत्यारोपण करणार
  • शोएब आता कधीच वेगाने पळू शकणार नाही
  • सुसाट वेगाने पळणे आता शोएबला जमणार नाही

My running days are over, says Shoaib Akhtar before going for knee replacement इस्लामाबाद: रावळपिंडी एकस्प्रेस या नावाने प्रसिद्ध असलेला पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर निवृत्त झाल्यानंतर त्याच्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत राहिला. पण आता शोएब अख्तर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. निमित्त आहे त्याने केलेल्या एका ट्वीटचे. या ट्वीटमध्ये त्याने दिलेल्या माहितीमुळे चाहते भावनिक झाले आहेत. अनेकजण वेगाने पळणाऱ्या शोएबच्या आठवणींमध्ये रममाण झाले आहेत. कारण शोएब आता कधीच वेगाने पळू शकणार नाही.

सतत वेगाने पळत गोलंदाजी केल्यामुळे शोएबच्या गुडघ्यांची झीज झाली आहे. अखेरचा उपाय म्हणून शोएबने ऑस्ट्रेलियात मेलबर्नच्या हॉस्पिटलमध्ये गुडघे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करुन घेणार असल्याचे जाहीर केले. तो दोन्ही गुडघ्यांवर शस्त्रक्रिया करुन घेणार आहे. या शस्त्रक्रियेनंतर शोएबच्या नैसर्गिक गुडघ्यांच्या जागेवर कृत्रिम गुडघे बसवले जातील. कृत्रिम गुडघ्यांच्या मदतीने सराव करुन चालणे शक्य आहे. पण सुसाट वेगाने पळणे आता जमणार नाही. यामुळेच शोएबने आता कधीच वेगाने पळू शकणार नाही; असे सांगणारे ट्वीट केले आहे.

शोएब अख्तरने २०११ मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. सध्या तो यू ट्युब चॅनलच्या माध्यमातून क्रिकेट मॅचचे विश्लेषण करतो. शोएब ४६ टेस्ट आणि १६३ वन डे मॅच खेळला. त्याने टेस्टमध्ये १७८ आणि वन डे मध्ये २४७ विकेट घेतल्या. तसेच त्याने १५ टी २० मॅच खेळून १९ विकेट घेतल्या. 

शोएब शेवटची वन डे न्यूझीलंड विरुद्ध २०११ मध्ये खेळला. या मॅचमध्ये त्याने एक विकेट घेतली. मॅच संपताच शोएबने औपचारिकरित्या निवृत्ती घेतली. ताशी १६१.३ किमी वेगाने पळून चेंडू टाकण्याचा विक्रम शोएब अख्तरने केला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी