ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायनचा विक्रम, भारताच्या आर. अश्विनला टाकले मागे

nathan lyon surpasses ravichandran ashwin to become 8th highest wicket taker in test cricket aus vs wi : ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फिरकीपटू नॅथन लायनने विक्रम केला. तो जगात सर्वाधिक टेस्ट विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आठव्या स्थानावर पोहोचला.

nathan lyon
ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायनचा विक्रम  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायनचा विक्रम
  • भारताच्या आर. अश्विनला टाकले मागे
  • नॅथन लायनने वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या पाचव्या दिवशी अश्विनला टाकले मागे

nathan lyon surpasses ravichandran ashwin to become 8th highest wicket taker in test cricket aus vs wi : ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फिरकीपटू नॅथन लायनने विक्रम केला. तो जगात सर्वाधिक टेस्ट विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आठव्या स्थानावर पोहोचला. लायनने भारताच्या आर. अश्विनला मागे टाकले. भारताच्या रवीचंद्रन अश्विनने टेस्ट क्रिकेटमध्ये आतापर्यंत 442 विकेट घेतल्या आहेत. नॅथन लायनने टेस्ट क्रिकेटमध्ये आतापर्यंत 444 विकेट घेतल्या आहेत. 

ऑस्ट्रेलियाचा ऑफ स्पिनर नॅथन लायनने वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या पाचव्या दिवशी टेस्ट क्रिकेटमधली 444 वी विकेट घेतली. पहिल्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाने 4 बाद 598 वर त्यांचा पहिला डाव सोडला. नंतर मैदानात आलेली विंडीज टीम 283 धावांत ऑल आऊट झाली. ऑस्ट्रेलियाने 2 बाद 182 वर दुसरा डाव सोडला. चौथ्या आणि निर्णायक डावात वेस्ट इंडिजची अवस्था 8 बाद 324 अशी झाली आहे. मॅचच्या चौथ्या डावात लायनने वेस्ट इंडिजच्या 2 बॅटरना बाद केले. त्याने जेसन होल्डरला डेव्हिड वॉर्नरकरवी झेलबाद केले. होल्डर 27 धावा करून बाद झाला. नंतर लायनने केमार रोचला शून्य धावांवर स्टिव्हन स्मिथकरवी झेलबाद केले.

Ruturaj Gaikwad: या क्रिकेरटरमुळे ऋतुराजने 1 ओव्हरमध्ये ठोकले 7 सिक्स...खोलले गुपित

भारताविरुद्धच्या वन डे सीरिजआधी बांगलादेशला मोठा धक्का

टेस्ट क्रिकेटमध्ये आतापर्यंत सर्वाधिक विकेट घेण्याची कामगिरी श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनने केली आहे. त्याने 800 टेस्ट विकेट घेतल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियच्या शेन वॉर्नने 708 टेस्ट विकेट घेतल्या आहेत. इंग्लंडच्या अँडरसनने 668 विकेट घेऊन यादीत तिसरा क्रमांक पटकावला आहे. भारताचा अनिल कुंबळे या यादीत 619 विकेटसह चौथ्या स्थानावर आहे. इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड 566 टेस्ट विकेटसह यादीत पाचव्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅग्रा 563 टेस्ट विकेटसह यादीत सहाव्या स्थानी आहे तर वेस्ट इंडिजचा कर्टनी वॉल्श 519 टेस्ट विकेटसह यादीत सातव्या स्थानी आहे. सर्वाधिक टेस्ट विकेट घेतलेल्या बॉलरच्या यादीत नॅथन लायन 444 विकेटसह आठव्या तर आर. अश्विन 442 विकेटसह नवव्या स्थानावर आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी