National Sports Awards 2021 : नीरज चोप्रा, मिताली राजसह 12 जणांना खेलरत्न पुरस्कार; शिखर धवनसह 35 खेळाडू ठरले अर्जुन पुरस्काराचे मानकरी

National Sports Awards 2021 Announced : टोकियो ऑलिम्पिक 2020 (Tokyo Olympics 2020) मध्ये भालाफेक (Javelin throw) या खेळात भारताला सुवर्ण पदक (Gold medal) मिळवून देणारा  गोल्डन बॉय नीरज चोप्राला खेलरत्न पुरस्कार (Khel Ratna Award) देण्यात येणार आहे.

National Sports Awards 2021
नीरज चोप्रा, मिताली राजसह 12 जणांना खेलरत्न पुरस्कार  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • 10 जणांना द्रोणाचार्य पुरस्कार देण्यात येणार
  • 13 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती भवनमध्ये खेळाडूंना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार
  • सुनील छेत्री खेल रत्न पुरस्कार मिळणारा पहिला फूटबॉलपटू

National Sports Awards 2021 Announced : नवी दिल्ली:  टोकियो ऑलिम्पिक 2020 (Tokyo Olympics 2020) मध्ये भालाफेक (Javelin throw) या खेळात भारताला सुवर्ण पदक (Gold medal) मिळवून देणारा  गोल्डन बॉय नीरज चोप्राला खेलरत्न पुरस्कार (Khel Ratna Award) देण्यात येणार आहे. नीरज चोप्रासह अजून 12 जणांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार (Major Dhyanchand Khel Ratna Award) जाहीर झाला आहे. या 12 जणांमध्ये रवी दहिया, पीआर श्रीजेश आणि लवलीना बोरगोहोई, भारताची अनुभवी महिला क्रिकेटपटू मिताली राज (Mithali Raj) आणि फूटबॉलपटू सुनील चेत्री, सुमित अंतिल,अवनी लेखरा आदींचा समावेश आहे. 

2021 हे वर्ष भारतीय खेळाडूंसाठी खास होतं. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताने मागील स्पर्धेच्या तुलनेत यंदा अधिक पदके भारताने जिंकली आहेत. ऑलिम्पिकसह पॅरालिम्पिकमध्येही भारतीय खेळाडूंनी धमाकेदार कामगिरी केली. पॅरालिम्पिकमध्ये पहिल्यांदाच दोन पदकं जिंकणाऱ्या अवनी लेखराचाही खेल रत्न पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. याशिवाय पॅरालिम्पिकमध्ये एफ64 मध्ये गोल्ड मेडल जिंकणाऱ्या सुमित अंतिल याचाही खेल रत्न देऊन गौरव करण्यात येईल.

याचबरोबर ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक जिंकून देणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंह याचाही खेलरत्न पुरस्कारात समावेश करण्यात आला आहे. खेलरत्न पुरस्कारासाठी 11 जणांची नामंकने होती. मनप्रीत सिंह याचे नाव समाविष्ट करण्यात आल्यामुळे एकूण 12 जणांना खेलरत्न पुरस्कार मिळणार आहे. शिखऱ धवन, संदीप नरवाल आणि भवानीदेवी यांच्यासह 35 जणांना अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. तर 10 जणांना द्रोणाचार्य पुरस्कार देण्यात येणार आहे. 13 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती भवनमध्ये सर्वांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते खेळाडूंना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल. ऑलिम्पिक आणि पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमुळे यंदा या पुरस्कारांची उशीरा घोषणा झाली आहे. 

पुरस्कार विजेत्या खेळाडूंची नावं – 

12 खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार :

नीरज चोप्रा (एथलेटिक्स), रवी कुमार (कुस्ती), लवलीना बोरगोहेन (बॉक्सिंग), पीआर श्रीजेश (हॉकी), अवनी लेखारा (पॅरा शूटिंग), सुमित अंतिल (पॅरा अथलेटिक्स), प्रमोद भगत (पॅरा बॅडमिंटन), कृष्णा नागर (पॅरा बॅडमिंटन), मनीष नरवाल (पॅरा शूटिंग), मिताली राज (क्रिकेट), सुनील छेत्री (फुटबॉल), मनप्रीत सिंह (हॉकी).

35 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार:

अरपिंदर सिंह (अथलेटिक्स), सिमरनजीत कौर (बॉक्सिंग), शिखर धवन (क्रिकेट), सीए भवानी देवी (तलवारबाजी), मोनिका (हॉकी), वंदना कटारिया (हॉकी), संदीप नरवाल (कबड्डी), हिमानी उत्तम परब (मल्लखंब), अभिषेक वर्मा (शूटिंग), अंकिता रैना (टेनिस), दीपक पूनिया (कुस्ती), दिलप्रीत सिंह (हॉकी), हरमनप्रीत सिंह (हॉकी), रूपिंदर पाल सिंह (हॉकी), सुरेंद्र कुमार (हॉकी), अमित रोहिदास (हॉकी)), बीरेंद्र लाकड़ा (हॉकी), सुमित (हॉकी), नीलकांत शर्मा (हॉकी), हार्दिक सिंह (हॉकी), विवेक सागर प्रसाद (हॉकी), गुरजंत सिंह (हॉकी), मनदीप सिंह (हॉकी), शमशेर सिंह (हॉकी), ललित कुमार उपाध्याय (हॉकी), वरुण कुमार (हॉकी), सिमरनजीत सिंह (हॉकी), योगेश कथूनिया (पॅरा अथलेटिक्स), निषाद कुमार (पॅरा अथलेटिक्स), प्रवीण कुमार (पॅरा अथलेटिक्स), सुहाश यतिराज (पॅरा बॅडमिंटन), सिंहराज अधाना (पॅरा शूटिंग), भावना पटेल (पॅरा टेबल टेनिस), हरविंदर सिंह (पॅरा तीरंदाजी) आणि शरद कुमार (पॅरा अथलेटिक्स).

खेल रत्न पुरस्कार मिळणारा पहिला फूटबॉलपटू 

दिग्गज फूटबॉलपटू सुनील छेत्री खेल रत्न पुरस्कार मिळणारा पहिला फूटबॉलपटू आहे. मागच्या वर्षी पाच खेळाडूंना खेल रत्न पुरस्कारांसाठी निवडण्यात आलं होतं. 2016 रियो ऑलिम्पिकनंतर चार खेळाडूंना या पुरस्कारासाठी निवडण्यात आले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी