मुंबई : नवी मुंबई प्रिमिअर लीगमध्ये सानपाडा स्कर्पिओ संघाच्या शुभम पुण्यार्थी याने आपल्या धडाकेबाज फंलदाजीने अंबरनाथ अॅव्हेंजर्स संघाच्या गोलंदाजांची चांगलीच दणादाण उडवली. शुभमने आपल्या खेळीत 55 चेंडूत 73 धावा ठोकल्या. शुभमच्या खेळीने संघाने निर्धारित षटकात 149 धावा करत अंबरनाथ अॅव्हेंजर्ससमोर 150 धावांचे आव्हन ठेवलं. परंतु अंबरनाथ अॅव्हेंजर्सचा 3 धावांनी पराभव झाला.
घंटाळी प्रबोधिनी संस्था ठाणे अध्यक्ष TMC माजी नगरसेवक श्री विलास शिवराम सामंत मार्फत नवी मुंबई प्रिमिअर लीग आयोजित करण्यात आली आहे. या लीमध्ये आज अंबरनाथ अॅव्हेंजर्स आणि सानपाडा स्कर्पिओ संघाचा सामना झाला. हा सामना ठाण्याच्या दादोजी कोंडदेव मैदानावर खेळवण्यात आला. या सामन्यात सानपाडा स्कर्पिओने जोरदार फंलदाजी केली. या संघाचा फलंदाज शुभम पुण्यार्थी याने 55 चेंडूत 73 धावा ठोकल्या. यात 8 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे.
शुभमच्या खेळीमुळे सानपाडा वारियर्स स्कर्पिओ संघाने 19.1 षटकात 149 धाव केल्या. धडाकेबाज फंलदाजीसाठी शुभमला मॅन ऑफ द मॅच घोषित करण्यात आलं आहे. अंबरनाथ अॅव्हेंजर्ससमोर सानपाडा संघाने 150 धावांचे आव्हान दिले.
या आव्हानाचा पार करण्यात अंबरनाथ अॅव्हेंजर्सचे फलंदाज अपयशी ठरले. अंबरनाथ अॅव्हेंजर्सच्या संघाने 7 गडी गमावत निर्धारित 20 षटकात 146 धावा केल्या. संघातील एका खेळाडूला अर्धशतक करता आले नाही.