जोस बटलर स्वतःचा विक्रम मोडण्यात अपयशी ठरला,  इंग्लंडसाठी झळकावले दुसरे सर्वात जलद वनडे शतक, इंग्लंडचा ४९८ धावांचा डोंगर

NED vs ENG, 1st ODI: जोस बटलरने शुक्रवारी नेदरलँड्सविरुद्ध अॅमस्टेलवीन येथील VRA मैदानावर 47 चेंडूत शतक झळकावले.

NED vs ENG Jos Buttler fails to breaks his own record but hits second fastest ODI hundred for England
इंग्लंडसाठी झळकावले बटलरने दुसरे सर्वात जलद वनडे शतक  
थोडं पण कामाचं
  • बटलरने 47 चेंडूत शतक झळकावले
  • डावाच्या 30व्या षटकात बटलर फलंदाजीला आला
  • बटलरच्या नावावर इंग्लंडच्या फलंदाजाकडून सर्वात जलद वनडे शतक करण्याचा विक्रम आहे

जोस बटलरने, शुक्रवारी, 17 जून रोजी, एकदिवसीय सामन्यांमध्ये इंग्लंडच्या फलंदाजाचे दुसरे-जलद शतक ठोकले. उजव्या हाताच्या फलंदाजाने शुक्रवारी, 17 जून रोजी अॅमस्टेलवीन येथील VRA मैदानावर इंग्लंडच्या नेदरलँड्सविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात केवळ 47 चेंडूत हा टप्पा गाठला. (NED vs ENG Jos Buttler fails to breaks his own record but hits second fastest ODI hundred for England)

नेदरलँड्सने प्रथम क्षेत्ररक्षण निवडल्यानंतर, थ्री लायन्सने जेसन रॉयची सुरुवातीची विकेट घेतली. वेगवान गोलंदाज शेन स्नेटरने डच संघासाठी प्रथम बळी घेत रॉयला माघारी धाडले. त्यानंतर फिल सॉल्ट आणि डेविड मलान यांनी दुसऱ्या विकेटसाठी 222 धावांची भागीदारी करत इंग्लंडचा डाव सावरला.

डावाच्या 30व्या षटकात बटलर फलंदाजीला आला, या अनुभवी खेळाडूने २७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. तर ४७ चेंडूत शतक झळकावले.  त्यानंतर पुढच्या २३ चेंडूत बटलरने नाबाद १६२ धावांची शानदार खेळी  केली आहे. 

या सामन्यात सॉल्ट आणि मिलान या दोघांनी शतक झळकावले.  फिलीप सॉल्ट याने ९३ चेंडूत १२२ धावा तर डाविड मलान याने १०९ चेंडूत १२५ धावा केल्या.  तसेच लियाम लिव्हिंगस्टोन याने २२ चेंडूत ६६ धावांची शानदार खेळी केली. 

फिलीप सॉल्ट याने १४ चौकार आणि ३ षटकार लगावले. डाविड मलान याने ९ चौकार आणि ३ षटकार, बटलर ने ७ चौकार आणि १४ षटकार तर लिव्हिंगस्टोन याने सहा चौकार आणि सहा चौकार लगावले. 

सौजन्य - Funcode 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी