T20 World Cup:वर्ल्डकपदरम्यान या खेळाडूने अचानक घेतली निवृत्ती, शेअर केला हा

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 08, 2022 | 12:14 IST | टाइम्स नाऊ मराठी

cricketer retirement: टी20 वर्ल्ड कप 2022 चा हंगाम शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. पाकिस्तान, इंग्लंड, न्यूझीलंड आणि भारताने सेमीफायनलसाठी क्वालिफाय केले आहे. 

india vs netherlands
वर्ल्डकपदरम्यान या खेळाडूने अचानक घेतली निवृत्ती, फोटो शेअर 
थोडं पण कामाचं
  • टी20 वर्ल्ड कप 2022 मध्ये नेदरलँड्स संघाने शानदार कामगिरी केली
  • संघाने ग्रुप स्टेजमधील शेवटच्या सामन्यात द. आफ्रिकेला 13 धावांनी हरवले.
  • यामुळे आफ्रिकेला सेमीफायनलमध्ये जागा बनवता आली नाही.

मुंबई: यंदाचा टी20 वर्ल्ड कपचा(t20 world cup) हंगाम जबरदस्त राहिला. वर्ल्डकपमधील अनेक सामने रोमहर्षक झाले. अखेरीस इंग्लंड(england), न्यूझीलंड(new zealand), पाकिस्तान(pakistan) आणि भारताने(india) टी20 वर्ल्ड कप 2022च्या सेमीफायनलसाठी(semifinal) क्वालिफाय केले आहे मात्र यातच एक स्टार क्रिकेटरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती(retirement from international cricket) घेतली आहे. त्याच्या या निर्णयामुळे चाहतेही हिरमुसले आहेत. जाणून घेऊया या खेळाडूबाबत...Netherlands cricketer stephan myburgh announce retirement from international cricket

अधिक वाचा - तरुणीच्या अंगलट आला तिचाच मूर्खपणा

या खेळाडूने घेतली निवृत्ती

टी20 वर्ल्ड कप 2022 मध्ये नेदरलँड्स संघाने शानदार कामगिरी केली. संघाने ग्रुप स्टेजमधील शेवटच्या सामन्यात द. आफ्रिकेला 13 धावांनी हरवले. यामुळे आफ्रिकेला सेमीफायनलमध्ये जागा बनवता आली नाही. आता नेदरलँड्सचा फलंदाज स्टीफन मायबर्गने निवृत्तीची घोषणा केली आहे. 38 वर्षीय या खेळाडूने सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. 

सोशल मीडियावर लिहिली ही पोस्ट

स्टीफन मायबर्गने सोशल मीडियावर पोस्ट करताना लिहिले, 12 हंगामाआधी आंतरराष्ट्रीय पदार्पण आणि 17 हंगामाआधी फर्स्ट क्लास डेब्यू करण्याचे क्षण अविस्मरणीय राहिले. मात्र आता शूज लटकवण्याची वेळ आली आहे. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की वर्ल्डकपमध्ये द. आफ्रिकेविरुद्ध विजयासह माझे करिअर समाप्त करेन. प्रत्येक खेळाडूला नेहमीच जिंकायचे असते आणि सर्व खेळाडूंप्रमाणेच माझ्या डोळ्यातही अश्रू होते. मी नेदरलँड्स क्रिकेटचे आभार मानतो. या पोस्टसह त्याने आपले शूज लटकवलेल्याचा फोटोही पोस्ट केला. 

नेदरलँड्सला जिंकून दिलेत अनेक सामने

स्टीफन मायबर्गचा जन्म 1984मध्ये द. आफ्रिकेत झाला होता. मात्र तो अनेक वर्षांपासून नेदरलँड्समध्ये राहत आहे. 2011मध्ये त्याने नेदरलँड्ससाठी डेब्यू केले. या वर्षात त्याने नेदरलँड्ससाठी खेळताना 22 वनडे सामन्यात 26.35 च्या सरासरीने 527 धावा केल्यात. याशिवाय त्याने 45 T20 सामने खेळलेत. यात त्याने 114.51च्या स्ट्राईक रेटने 915 धावा केल्यात.

अधिक वाचा -  रेडिओग्राफीची गरज कधी पडते?

टी20 वर्ल्ड कपमध्ये शानदार कामगिरी

नेदरलँड्सने टी20 वर्ल्ड कप 2022 मध्ये खूप शानदार कामगिरी केली. संघाने शेवटच्या सामन्यात द. आफ्रिकेला रोमहर्षक सामन्यात 13 धावांनी मात दिली. याशिवाय नेदरलँड्सने झिम्बाब्वेला 5 विकेटनी हरवले. याच कारणामुळे  2024मध्ये होणाऱ्या टी20 वर्ल्डकपसाठी सरळ क्वालिफाय केले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी