गुगलची नवी गुगली, आता सारा तेंडुलकरला सांगितले 'या' युवा क्रिकेटपटूची पत्नी

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Oct 15, 2020 | 12:55 IST | टाइम्स नाऊ मराठी

sara tendulkar: सर्च इंजिन गुगल गेल्या काही दिवसांपासून आपल्या चमत्कारिक सर्च रिझल्टमुळे चर्चेत आहे. आता गुगल सर्च सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरला शुभमन गिल या क्रिकेटरची पत्नी म्हणून दाखवत आहे.

Sara Tendulkar
गुगलची नवी गुगली, आता सारा तेंडुलकरला सांगितले 'या' युवा क्रिकेटपटूची पत्नी  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • गूगल सर्च इंडिनमधल्या बगमुळे दिसत आहेत चमत्कारिक रिझल्ट
  • आता सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरला या क्रिकेटपटूची पत्नी म्हणून दाखवले
  • याआधी लेग स्पिनर राशिद खानची पत्नी म्हणून दाखवले होते अनुष्का शर्माचे नाव

नवी दिल्ली: सर्च इंजिन (Search engine) गुगलचा (Google) गुगली टाकण्याचा खेळ अद्याप सुरूच आहे. नुकतेच अफगाणिस्तानचा (Afghanistan) लेग स्पिनर (leg spinner) राशिद खानच्या पत्नीला (Rashid Khan’s wife) सर्च केल्यावर भारताचा क्रिकेट कर्णधार (Indian cricket captain) विराट कोहलीची (Virat Kohli) पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood actress) अनुष्का शर्माचे (Anushka Sharma) नाव दाखवले जात होते. आता अशाच एका प्रकारात भारताचा युवा क्रिकेटपटू शुभमन गिलच्या (Shubhman Gill) पत्नीला सर्च केल्यास सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) मुलगी सारा तेंडुलकरचे (Sara Tendulkar) नाव येत आहे.

सोशल मीडियावर या दोघांच्या अफेअरची चर्चा

गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर चर्चा रंगली होती की सारा आणि शुभमन एकमेकांना डेट करत आहेत. पण या बातम्यांची पुष्टी कोणीही केलेली नाही. मात्र हे दोघे नेहमीच एकमेकांच्या सोशल मीडियावरील पोस्ट्स लाईक करतात आणि त्यावर कॉमेंट्सही करतात. अनेकदा या दोघांच्या कॅप्शन्सही एकसारख्या असतात. त्यामुळे लोकांचे लक्ष त्यांच्यावर आणि त्यांच्यातील नात्यावर गेले आहे.

काय करते सारा तेंडुलकर

नुकताच १२ ऑक्टोबर रोजी साराने आपला २३वा वाढदिवस साजरा केला. सामान्यपणे ती इतर स्टारकिड्सच्या तुलनेत माध्यमांपासून दूर राहणे पसंत करते. सारा तिच्या आजीसह अपनालय नावाच्या स्वयंसेवी संस्थेसाठी काम करते.

काय आहे गुगल सर्चचा प्रकार

गुगलचे सर्च इंजिन हे सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या किंवा वाचण्यात आलेल्या लेख, बातम्या यांचे रिझल्ट सर्वप्रथम दाखवते आणि त्यातील मजकुरानुसार गूगल सर्चचे अल्गोरिदम काम करते. काही दिवसांपूर्वी एका मासिकाने अनुष्का ही राशिद खानची पत्नी असल्याची चुकीची माहिती दिली होती. तसेच याबाबत अनेक लोकांनीही सर्च केला होता. या लाटेमुळे गूगलचे अल्गोरिदम्स गोंधळले आणि त्यांनी अशी चुकीची माहिती देण्यास सुरुवात केली. सारा आणि शुभमनच्या प्रकरणातही असाच काही गोंधळ झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी