मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा (team india) हिटमॅन म्हणून रोहित शर्माची (rohit sharma) ओळख आहे. कारण भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (cricket) सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रोहितच्या नावावर आहे. पण आता भारतीय संघातील एक यष्टिरक्षक-फलंदाज त्याला टक्कर देत आहे. 2021 मध्ये या डावखुऱ्या स्टारने भारतीय फलंदाज रोहित शर्मालाही मागे सोडले. तो दुसरा-तिसरा कोणी नसून ऋषभ पंत (Rishabh Pant ) आहे. (New 'Sixer King' entry in Team India, hitting the highest number of sixes in 2021, leaving Rohit Sharma behind)
ऋषभ पंतने या वर्षी भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 36 षटकार ठोकले आहेत आणि तो भारतीय फलंदाजांमध्ये आघाडीवर आहे. पंतने यावर्षी कसोटीत सर्वाधिक 15 षटकार आणि एकदिवसीय सामन्यात 11 षटकार मारले आहेत. यासोबतच त्याने टी-20 इंटरनॅशनलमध्ये 10 षटकार ठोकले असून तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.
2021 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत पंतने आतापर्यंत 4 षटकार मारले आहेत आणि हे चारही षटकार एका हाताने मारले आहेत. हे षटकार तो अचानक मारतो असे नाही, तर त्याआधी तो नेटमध्ये सराव करतो. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात ऋषभ पंतने हार्दिक पांड्यासोबत 21 चेंडूत 63 धावांची नाबाद भागीदारी केली. या भागीदारीत हार्दिक पांड्याचे योगदान 13 चेंडूत 35 धावांचे होते. पंड्याच्या खेळीत 4 चौकार आणि 2 षटकार होते. 2021 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत हार्दिक पांड्या पहिल्यांदाच जुन्या फॉर्ममध्ये दिसला. या सामन्यात भारताने एकूण 210 धावा केल्या होत्या. पण, प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघ 20 षटकांत 7 गडी गमावून 144 धावाच करू शकला. आणि भारताने हा सामना 66 धावांनी जिंकला.
दुसरीकडे, रोहित शर्माने यावर्षी केवळ 34 षटकार ठोकले असून पंतनंतर तो दुसरा भारतीय फलंदाज आहे. रोहितने T20I मध्ये सर्वाधिक षटकार मारले आहेत, तर त्याने कसोटीत 11 षटकार ठोकले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे रोहितने वनडेमध्ये एकही षटकार मारला नाही. पंत आणि रोहित हे देखील यावर्षी भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये आहेत. रोहितने तिन्ही फॉरमॅटमध्ये 35 डावांमध्ये एकूण 1420 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याची सरासरी 43 आहे आणि 2 शतके - 9 अर्धशतके आहेत. त्याच वेळी, पंतने 31 डावांमध्ये 41.30 च्या सरासरीने 1074 धावा केल्या आहेत, ज्यात 1 शतक आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे.