हॅमिल्टन : जगभरातील क्रिकेट चाहत्यांवर सध्या आयपीएल २०२२चा(ipl 2022) फिव्हर चढला आहे. यातच वर्ल्ड क्रिकेटमधील एका दिग्गज खेळाडूने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती(retirement from international cricket) घेतली आहे. या दिग्गज क्रिकेटरच्या अचानक निवृत्ती घेतल्याने चाहते मात्र चांगलेच नाराज झाले आहेत. New zealand cricketer Ross taylor retired from international cricket
अधिक वाचा - गोरखनाथ मंदिरावर हल्ला, ATS चा तपास सुरू
न्यूझीलंडचा स्टार क्रिकेटर रॉस टेलरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला नेहमीसाठी अलविदा म्हटले आहे. त्याच्या या निर्णयाने चाहते मात्र नाराज झालेत. आपल्या करिअरमधील शेवटच्या सामन्यादमरम्यान रॉस टेलर ढसाढसा रडला. रॉस टेलरने नेदरलँडविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात सोमवारी हॅमिल्टनमध्ये न्यूझीलंडकडून आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. यात त्याने १४ धावा केल्या. प्रेक्षकांनी उभे राहत रॉस टेलरला अभिवादन केले.
Ross Taylor is about to play his final international game of cricket for New Zealand.
— Spark Sport (@sparknzsport) April 4, 2022
We will miss you Rosco #SparkSport #NZvNED pic.twitter.com/Y6kmXVHvSH
न्यूझीलंड क्रिकेटचा प्राण असे समजला जाणारा रॉस टेलर आपल्या करिअरमधील शेवटच्या सामन्यादरम्यान ढसाढसा रडला. नेदरलँड्सविरुद्धच्या हॅमिल्टनमधील तिसऱ्या वनडे सामन्याआधी राष्ट्रगीतादरम्यान रॉस टेलरला अश्रू आवरता आले नाहीत. यानंतर सहकाऱ्यांनी त्याला सावरले. या दरम्यान टेलरची पत्नी आणि मुलेही तेथे उपस्थित होती. रॉस टेलरचा नेदरलँडविरुद्ध हा सामना न्यूझीलंडसाठी ४५०वा शेवटचा सामना होता. यासोबतच त्याच्या १६ वर्षीय करिअरही समाप्त झाले. या ३८ वर्षीय फलंदाजाने या वर्षी सुरूवातील दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला होता.
अधिक वाचा - इतिहासात प्रथमच होणार चतुर्भुज मालिका?
राष्ट्रगीतादरम्यान रॉस टेलरची मुले मँकेजी, जोंटी आणि एडिलेड त्याच्यासोबत उभे होते. जब रॉस टेलर मैदानावार उतरला आणि परतला तर नेदरलँडच्या खेळाडूंनी दोन्ही बाजूंना उभे राहत त्याला सन्मान दिला. रॉस टेलरने ११२ कसोटी सामन्यांमध्ये १९ शतकांच्या मदतीने ७,६८३ धावा केल्या. टेलरने २३६ वनडे सामन्यांमध्ये ८५९३ धावा केल्या. १०२ टी-२० सामन्यांमध्ये १९०९ धावा केल्या. टेलर जगातील एकमेव खेळाडू आहे ज्याने तीनही फॉरमॅटमध्ये १००पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.