T20 World Cup 2022: वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचला हा पहिला संघ

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 04, 2022 | 14:50 IST | टाइम्स नाऊ मराठी

New Zealand: कर्णधार केन विल्यमसन्सच्या तुफानी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने टी20 वर्ल्ड कप 2022च्या सेमीफायनलमध्ये स्थान मिळवले आहे. केन विल्यमसन्सने 35 बॉलमध्ये 61 धावांची खेळी केली. 

world cup 2022
T20 वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचला हा पहिला संघ 
थोडं पण कामाचं
  • न्यूझीलंड संघाने टी20 वर्ल्ड कप 2022च्या सेमीफायनलमध्ये मारली धडक
  • आयर्लंडला हरवत गाठली सेमीफायनल
  • कर्णधार केन विल्यमसन्सची तुफानी खेळी

मुंबई: कर्णधार केन विल्यमसन्सच्या(kane williamsons) तुफानी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने(new zealand) टी20 वर्ल्ड कप 2022च्या(t20 world cup 2022) सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. न्यूझीलंड हा टी20 वर्ल्ड कप 2022च्या सेमीफायनलमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. केन विल्यमसन्सने 35 बॉलमध्ये 61 धावांची खेळी केली. आणि लॉकी फर्ग्युसनच्या 3 विकेटच्या जोरावर न्यूझीलंडने ग्रुप 1मधील आपल्या शेवटच्या सामन्यात आयर्लंडला 35 धावांनी मात दिली. new zealand reach in semifinal of T20 World Cup 2022

अधिक वाचा - हे नाणं असेल तर कमवू शकता हजारो रुपये

विल्यमसन्से वादळ, सेमीफायनलमध्ये न्यूझीलंड

न्यूझीलंड या विजयासह ग्रुप 1मध्ये पॉईंट्स टेबलमध्ये 7 अंकांसह टॉपवर आहे आणि सेमीफायनलमध्ये एंट्री केली आहे.  न्यूझीलंड टी20 वर्ल्ड कप 2022 च्या सेमीफायनलमध्ये पोहोचणार पहिला संघ ठरला आहे. 

विल्यमसन्सला 'प्लेयर ऑफ दी मॅच'चा पुरस्कार

न्यूझीलंडने अॅडले़ड ओव्हलमध्ये सुपर 12च्या ग्रुप 1मधील सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना आयर्लंडविरुद्ध 6 बाद 185 धावा केल्या होत्या. आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडच्या संघाला 9 बाद 150 धावा करता आल्या. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन्सला त्याच्या अर्धशतकीय खेळीसाठी प्लेयर ऑफ दी मॅचचा पुरस्कार मिळाला. 

विल्यमसन्मने 5 चौकार आणि 3 सिक्सर ठोकले

केन विल्यमसन्सने स्पर्धेतील आपले पहिले अर्धशतक ठोकले. केन विल्यमसन्सने 35 बॉलमध्ये 61 धावांची खेळी केली. या दरम्यान त्यांनी पाच चौकार आणि तीन षटकार ठोकले. फिन अॅलेनने 32धावा आणि डेवोन कॉन्वेने 28 धावांची खेळी केली. डॅरेल मिचेलने 21 बॉलमध्ये नाबाद 31 धावा कुटल्या. 

अधिक वाचा - नोकरदारांना झटका! सरकराने नाकारला पेन्शन वाढीचा प्रस्ताव

ग्रुप 2मध्ये आलीये रंगत

दरम्यान, ग्रुप 1 मध्ये सेमीफायनलमध्ये एक संघ पक्का ठरलेला असताना ग्रुप 2मध्ये सेमीफायनलची रंगत वाढलीये. एकीकडे पाकिस्तानने द. आफ्रिकेला हरवल्याने त्यांच्या सेमीफायनलच्या आशा अद्याप जिवंत आहेत. दुसरीकडे भारतही सेमीफायनलमध्ये जाण्याच्या उंबरठ्यावर आहे. त्यांनी झिम्बाब्वेला हरवले तर सेमीफायनल गाठतील. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी