एका डावात १० विकेट घेणारा Ajaz Patel न्यूझीलंड टीममधून झाला OUT

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Dec 23, 2021 | 15:44 IST | टाइम्स नाऊ मराठी

Ajaz Patel: जिम लेकर आणि अनिल कुंबळे यांच्यानंतर एका डावात सर्व १० विकेट घेत वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या एजाज पटेलला त्यांच्याच न्यूझीलंड संघाने बाहेर फेकले आहे. न्यूझीलंड क्रिकेट संघाने बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी त्याला संघातून वगळले आहे. 

ajaz patel
एका डावात १० विकेट घेणारा Ajaz Patel न्यूझीलंड टीममधून OUT 
थोडं पण कामाचं
  • एजाज पटेलला संघातून वगळले
  • पटेलने केला होता वर्ल्ड रेकॉर्ड

मुंबई: भारताविरुद्ध या महिन्यात एका डावात १० विकेट घेत इतिहास रचणारा लेफ्ट आर्म स्पिनर एजाज पटेलला(ajaz patel) त्याच्याच संघाने बाहेर केले आहे. जिम लेकर( आणि अनिल कुंबळे यांच्यानंतर एका डावात १० विकेट घेत वर्ल्ड रेकॉर्ड करणारा एजाज पटेलला न्यूझीलंड संघाने out केले आहे. न्यूझीलंड क्रिकेट संघाने(new zealand cricket team) बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेसाठी एजाज पटेलला संघातून वगळले आहे. new zealand spinner ajaz patel out of team for bangladesh test series

बांगलादेशचा संघ न्यूझीलंडचा दौरा करणार आहे. दोन्ही देशांदरम्यानच्या मालिकेला १ जानेवारीपासून सुरूवात होत आहे. किवी टीमने आपला वेगवान गोलंदाजी अॅटॅक मजबूत करण्यासाठी टीम साऊदी, ट्रेंट बोल्ट, नील वॅग्नर, काईल जेमीसन यांच्या शिवाय मॅट हेन्रीलाही सामील केले आहे. तर एकमेव स्पिनर रचिन रवींद्रला संघात जागा दिली आहे. एजाज पटेलने १० विकेट घेत वर्ल्ड रेकॉर्ड केल्यानंतरही संघातून वगळण्यात आले आहे. 

एजाज पटेलला संघातून वगळल्यानंतर अनेक प्रकारचे सवाल केले जात आहेत. न्यूझीलंड संघाने विधान जारी करताना म्हटले, न्यूझीलंडमध्ये कडिशन्स लक्षात घेता एजाज पटेलला बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवडण्यात आलेले नाही. याशिवाय न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन्सही नसणार आहे. त्यामुळे न्यूझीलंडचे नेतृत्व टॉम लॅथम करणार आहे. 

एजाज पटेलने केला होता वर्ल्ड रेकॉर्ड

एजाज पटेलने मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये भारतीय संघाविरुद्ध या महिन्याच्या सुरूवातीला खेळलेल्या कसोटी सामन्यात एका डावात १० विकेट घेत वर्ल्ड रेकॉर्ड बनवला होता. एजाजने ४७.५ ओव्हरमध्ये १२ मेडन राखत ११९ धावा दिल्या आणि भारताच्या पहिल्या डावात १० विकेट मिळवल्या होत्या. एजाज कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात १० विकेट मिळवणारे जगातील तिसरा गोलंदाज आहे.

एजाजआधी अनिल कुंबळे आणि इंग्लंडच्या जिम लेकरने ही कमाल केली होती. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका डावात १० विकेटघेण्याचा रेकॉर्ड सगळ्यात आधी इंग्लंडच्या जिम लेकरच्या नावावर होता. जिमने १९५६मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मँचेस्टर कसोटीत एका डावात १० विकेट मिळवल्या होत्या. जिमच्या या रेकॉर्डशी भारताचा लेग स्पिन अनिल कुंबळेने १९९९मध्ये बरोबरी केली. कुंबळेने पाकिस्तानिवरुद्धच्या दिल्लीतील एका कसोटी सामन्यात एका डावातील सर्व १० फलंदाजांना बाद केले होते. 

बांगलादेशविरुद्ध न्यूझीलंडचा कसोटी संघ - टॉम लाथम (कर्णधार), रॉस टेलर, मैट हेनरी, काइल जॅमीसन, डॅरिल मिचेल, हेनरी निकोल्स, रचिन रविंद्र, टीम साउदी, टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डेवन कॉन्वे, नील वॅग्नर, विल यंग.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी