ENG vs NZ: END vs NZ मालिकेवर कोरोनाचे सावट; आता हा दिग्गज आढळला कोरोना पॉझिटीव्ह

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jun 10, 2022 | 14:28 IST | टाइम्स नाऊ मराठी

Kane Williamson Covid-19 positive । कोरोना विषाणूचा कहर थांबण्याचे नाव घेत नाही असे दिसत आहे. आता पुन्हा एकदा या विषाणूचा संसर्ग वाढत आहे. गुरुवारी भारताविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू ॲडन मार्करामला कोविडची लागण झाली होती. द

New Zealand team skipper now Ken Williamson found corona positive
END vs NZ मालिकेवर कोरोनाचे सावट, हा खेळाडू कोरोना पॉझिटीव्ह  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कोरोना विषाणूचा कहर थांबण्याचे नाव घेत नाही असे दिसत आहे.
  • इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यामधील कसोटी मालिकेवर कोरोनाचे सावट.
  • केन विल्यमसनची कोविड-१९ चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

Kane Williamson Covid-19 positive । नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा कहर थांबण्याचे नाव घेत नाही असे दिसत आहे. आता पुन्हा एकदा या विषाणूचा संसर्ग वाढत आहे. गुरुवारी भारताविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू ॲडन मार्करामला कोविडची लागण झाली होती. दरम्यान आता न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनची कोविड-१९ चाचणी पॉझिटिव्ह आली असून तो आजपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही.

अधिक वाचा : विदर्भात २७ जूनपासून उर्वरित महाराष्ट्रात १५ जूनपासून शाळा

टॉम लॅथम सांभाळणार धुरा

केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत टॉम लॅथम संघाचे नेतृत्व करेल. कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्यानंतर विल्यमसनची गुरुवारी रॅपिड अँटीजेन चाचणी (RAT) झाली आणि आता तो पुढील पाच दिवस आयसोलेशनमध्ये असेल. दिलासादायक बाब म्हणजे संघातील उर्वरित सदस्यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी म्हटले की केन विल्यमसनच्या जागी हॅमिश रदरफोर्ड संघात सामील होईल.

दरम्यान न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी म्हटले की, "एवढ्या महत्त्वाच्या सामन्याच्या पूर्वसंध्येला केनला बाहेर जाण्यास भाग पाडले गेले हे निराशाजनक आहे." हामिश पहिल्या कसोटीमध्ये संघात होता आणि सध्या व्हिटॅलिटी टी-२० ब्लास्टमध्ये लीसेस्टरशर फॉक्सकडून खेळत आहे. असे त्यांनी आणखी म्हटले. 

इंग्लंडची विजयी सुरूवात 

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. दरम्यान तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत न्यूझीलंडला ५ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्या सामन्यात जो रूटच्या नाबाद ११५ धावांच्या जोरावर इंग्लंडने हा सामना जिंकला. रुटने त्याच्या शतकीय खेळीत कसोटी क्रिकेटमधील दहा हजार धावा पूर्ण केल्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी