टीम साऊथीच्या नावे 'सुपर ओव्हर'चा घाणेरडा विक्रम, काय तुम्हीच पाहा

 न्यूझीलंड विरुद्ध भारत यांच्यात आज वेलिंग्टन येथे झालेल्या चौथ्या टी २० सामन्यात अत्यंत चुरशीच्या लढतीत भारताने न्यूझीलंडचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला.

new zealand vs india wellington t20 tim southee super over record stats cricket news in marathi tcri 39
 टीम साऊथीच्या नावे 'सुपर ओव्हर' घाणेरडा विक्रम, काय तुम्हीच पाहा 

 वेलिंग्टन :  न्यूझीलंड विरुद्ध भारत यांच्यात आज वेलिंग्टन येथे झालेल्या चौथ्या टी २० सामन्यात अत्यंत चुरशीच्या लढतीत भारताने न्यूझीलंडचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. या सामन्यात भारताने या सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवत ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत ४-० अशी विजयी आघाडी घेतली.

आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये न्यूझीलंड संघ  सातव्यांदा सुपर ओव्हर खेळल्यानंतर पराभूत झाला आहे. न्यूझीलंडने आत्तापर्यंत एकूण सात टी२० सामन्यात सुपर ओव्हर खेळले आहेत. त्यातील केवळ १ सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवला आहे.

आज झालेल्या सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडकडून वेगवान गोलंदाज टीम साऊथीने गोलंदाजी केली होती. विशेष म्हणजे साऊथीने आत्तापर्यंत न्यूझीलंडकडून ६ टी२० सामन्यात सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी केली आहे. यातील केवळ एका सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवला आहे. तर अन्य ६ सामन्यात न्यूझीलंडला पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. 

हा एकमेव विजय न्यूझीलंडने क्राईस्टचर्च येथे २०१०मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या टी२० सामन्यात मिळवला आहे. त्यामुळे साऊथीची सुपर ओव्हरमधील आकडेवारी पाहता तो न्यूझीलंडसाठी सुपर ओव्हरमध्ये अनलकी ठरल्याचे दिसून येत आहे.

टीम साऊथी न्यूझीलंडकडून सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी केलेले टी२० सामने -

  1. ऑस्ट्रेलिया विरुद्ध - टी२०, क्राईस्टचर्च, २०१० (विजय)

  2.  श्रीलंका विरुद्ध- टी२०, पल्लेकेले, २०१२ (पराभव)

  3.  वेस्ट इंडिज विरुद्ध - टी२०, पल्लेकेले, २०१२ (पराभव)

  4. इंग्लंड विरुद्ध - टी२०, ऑकलंड, २०१९ (पराभव)

  5. भारत विरुद्ध - टी२०, हॅमिल्टन, २०२० (पराभव)

  6. भारत विरुद्ध - टी२०, वेलिंग्टन, २०२० (पराभव)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...