IND vs NZ: टॉमच्या वादळासमोर भारताची शरणागती

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 25, 2022 | 15:02 IST | टाइम्स नाऊ मराठी

टॉम लॅथमची 145 धावांची झुंजार खेळी आणि कर्णधार केन विल्यमसन्सच्या(kane willamsons)  धावांच्या जोरावर न्यूझीलंडने भारतावर 7 विकेट राखत विजय मिळवला.

india vs new zealand
गिल,धवन,अय्यरची तुफानी खेळी, न्यूझीलंडला हव्यात इतक्या धावा 
थोडं पण कामाचं
  • या पहिल्या वनडे सामन्यात भारताचा सलामीवीर शिखर धवन, शुभमन गिल आणि त्यानंतर मधल्या फळीतीली श्रेयस अय्यर यांनी धमाकेदार खेळाचे प्रदर्शन केले.
  • शिखर धवनने सलामीला येताला 72 धावा कुटल्या.
  • त्याला गिलची चांगली साथ मिळाली. त्याने 50 धावा केल्या.

मुंबई: भारत आणि न्यूझीलंड(india vs new zealand) यांच्यातील वनडे मालिकेतील(one day series) पहिला सामना न्यूझीलंडने जिंकला आहे. टॉम लॅथमची 145 धावांची झुंजार खेळी आणि कर्णधार केन विल्यमसन्सच्या(kane willamsons)  धावांच्या जोरावर न्यूझीलंडने भारतावर 7 विकेट राखत विजय मिळवला. सलामीची जोडी अपयशी ठरल्यानंतर कर्णधार केन विल्यमसन्सने किल्ला लढवण्यास सुरूवात केली.New zealand won by 7 wickets against India

मिचेल पटकन बाद झाल्यानंतर टॉम लॅथम मैदानावर उतरला. त्यानंतर त्याने विल्यमसन्सला जबरदस्त साथ देत संघाला विजय मिळवून दिला. टॉम लॅथमने या सामन्यात नाबाद 145 धावा ठोकल्या तर कर्णधार विल्यमसन्सने 94 धावांची खेळी केली. या विजयासह न्यूझीलंडच्या संघाने भारताविरुद्धच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. 

तत्पूर्वी, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन्सने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सलामीवीर शिखर धवन, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्या तुफानी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत विजयासाठी 307 धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने 50 ओव्हरमध्ये 7 बाद 306 धावा केल्या. ऑकलंडच्या ईडन पार्क स्टेडियममध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवल्या जाणाऱ्या पहिल्या वनडेत टीम इंडियाने धमाकेदार सुरूवात केली आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन्सने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. New zealand need 307 runs to win against india

अधिक वाचा - ओठांचा रंग आणि आकारावरून कळेल गर्लफ्रेंड कशी आहे?

अय्यर, गिल, धवनने केला धमाकेदार खेळ

या पहिल्या वनडे सामन्यात भारताचा सलामीवीर शिखर धवन, शुभमन गिल आणि त्यानंतर मधल्या फळीतीली श्रेयस अय्यर यांनी धमाकेदार खेळाचे प्रदर्शन केले. शिखर धवनने सलामीला येताला 72 धावा कुटल्या. त्याला गिलची चांगली साथ मिळाली. त्याने 50 धावा केल्या. त्यानंतर मधल्या फळीत आलेल्या श्रेयस अय्यरने 80 धावांची तुफानी खेळी केली. या तीनही फलंदाजांच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर भारताला तीनशेपार मजल मारता आली. 

संधी मिळताच केली जबरदस्त खेळी

न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाच्या डावाची सुरूवात शिखर धवनसह फलंदाज शुभमन गिलने केली. शुभमन गिल टी-20 मालिकेतही टीम इंडियाच्या स्क्वॉडमध्ये सामील होता मात्र त्याला एकही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. शुभमन गिलने वनडे सामन्यात संधी मिळताच कमालीची खेळी केली. 

न्यूझीलंडच्या गोलंदाजांना धुतले

शुभमन गिलने या सामन्यात टीम इंडियाला चांगली सुरूवात करून दिली. त्याने 65 बॉलचा सामना करताना 50 धावा ठोकल्या. या डावात शुभमन गिलच्या बॅटमधून 1 चौकार आणि 3 षटकार पाहायला मिळाले. वनडे क्रिकेटमधील 13 डावांतत शुभमन गिलचे हे चौथे अर्धशतक होते. शुभमन गिलने टीम इंडियासाठी वनडेत आतापर्यंत 57.18च्या सरासरीने 629 धावा केल्या आहेत.

अधिक वाचा -  शारीरिक संबंधांदरम्यान 67 वर्षीय व्यापाऱ्याचा मृत्यू

पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी

शिखर धवन आणि शुभमन गिल यांनी पुन्हा एकदा भारताला चांगली सुरूवात करून दिली. दोन्ही खेळाडूंमध्ये पहिल्या विकेटसाठी 124 धावांची भागीदारी पाहायला मिळाली. शिखर धवनने या सामन्यात कर्णधारपदाची खेळी करत 77 बॉलमध्ये 72 धावा केल्या यात त्याने 13 चौकार ठोकले. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी