Bhuvneshwar Kumar च्या बचावासाठी बायकोने खोचला पदर, रिकामटेकड्यांना सुनावले खडे बोल

bhuvneshwar kumar trolls : भुवनेश्वर कुमारची पत्नी नुपूर नागर आपल्या पतीच्या समर्थनार्थ मैदानात उतरली आहे. नुपूरने ट्रोल्सला खडे बोल सुनावले आहेत. डेथ ओव्हर्सच्या गोलंदाजांची खराब कामगिरी भारतीय संघासाठी चिंतेचा विषय आहे.

'No one cares about your words...' Wife Nupur came to the rescue of Bhuvneshwar Kumar, took a class of trolls
भुवनेश्वरच्या बचावासाठी बायकोने खोचला पदर, रिकामटेकड्या लोकांना म्हणाली... ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भुवनेश्वर कुमारची पत्नी नुपूर नागरने पतीला साथ दिली.
  • ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मोहाली टी-20 सामन्यात भुवी चांगलाच महागात पडला.
  • त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार हा 'डेथ ओव्हर्स'चा स्पेशालिस्ट गोलंदाज मानला जातो. भुवीने हे अनेक प्रसंगी सिद्धही केले आहे. पण अलीकडे या 'सुलतान ऑफ स्विंग'चा परफॉर्मन्स काही विशेष राहिला नाही. ऑस्ट्रेलिया विरुद्ध मोहाली T20 (IND vs AUS) मध्ये भुवीने चार षटकात 52 धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही. या सामन्यातील 19व्या षटकात तो चांगलाच महागडा ठरला. सोशल मीडियावर लोकांनी त्याला प्रचंड ट्रोल करण्यास सुरुवात केली. यानंतर भुवनेश्वरची पत्नी नुपूर नागरने ट्रोल्सना खडे बोल सुनावले. ('No one cares about your words...' Wife Nupur came to the rescue of Bhuvneshwar Kumar, took a class of trolls)

अधिक वाचा : IND vs AUS: एका वर्षात टीम इंडियाला डबल झटका, पहिल्या टी-२०मध्ये झाला लाजिरवाणा रेकॉर्ड

मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भुवीने 19व्या षटकात 16 धावा दिल्या. त्यात वाईडचाही समावेश होता. नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषक स्पर्धेतील सुपर फोरच्या सामन्यात भुवीने अवघ्या 4 धावांत 5 बळी घेतले. सलग दोन सामन्यांमध्ये डेथ ओव्हर्समध्ये अपेक्षेपेक्षा जास्त धावा दिल्याने भुवीला टीकेला सामोरे जावे लागले.

अधिक वाचा :Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकरचा किचनमध्येही जलवा, ऑम्लेट पाहून ब्रेट ली म्हणाला, खायला येतोय

नूपुरने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले की, 'आजकाल लोक खूप रिकामटेकडे झालेत. त्याच्याकडे काम नाही आणि ते इतके रिकामटेकडे आहेत की त्याच्याकडे द्वेष आणि मत्सर पसरवायला खूप वेळ आहे. या सर्वांना माझा सल्ला आहे की तुम्ही काय बोलता आणि तुमच्या असण्याकडे कोणी लक्ष देत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही हा वेळ स्वत:ला सुधारण्यात घालवला पाहिजे. जरी त्याची व्याप्ती खूपच कमी आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी