कोहली, जडेजा, पंत यांना स्थान नाही? झहीर खानने दुसऱ्या टी-२० साठी केली प्लेईंग ११ची निवड

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jul 08, 2022 | 17:53 IST | टाइम्स नाऊ मराठी

Zaheer Khan picks playing 11 of India: भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानने दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी भारताच्या प्लेईंग ११ची निवड केली आहे. 

zaheer khan
झहीरच्या प्लेईंग ११मध्ये कोहली, जडेजा, पंतला स्थान नाही 
थोडं पण कामाचं
  • भारताने इंग्लंडला पहिल्या टी-२०मध्ये हरवले
  • झहीर खानने सांगितले वरि्ठ खेळाडूंच्या पुनरागमनानंतरही जास्त बदलाची शक्यता नाही
  • झहीरचया मते अर्शदीप सिंहच्या जाी जसप्रीत बुमराहला घ्यावे

मुंबई: टीम इंडियाने(team india) पहिल्या टी-२० सामन्यात इंग्लंडला ५० धावांनी हरवले. आता दोन्ही देशांदरम्यानचा दुसरा टी-२० सामना शनिवारी बर्मिंगहममध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी अनेक वरिष्ठ खेळाडू भारतीय संघात सामील होतील. ज्यामुळे टीम मॅनेजमेंटला(team management) अंतिम ११ची निवड करणे कठीण होणार आहे.No place for kohli, jadeja and pant in zaheer khan playing 11 t-20 team

अधिक वाचा - उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील १० महत्त्वाचे मुद्दे

संघ जेव्हा जिंकतो तेव्हा बदलाची शक्यता कमी असते मात्र दुसऱ्या टी-२०साठी विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा आणि ऋषभ पंत यासारखे खेळाडू जोडले जाणार आहेत. आता हे पाहावे लागेल की भारतीय टीम इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी आपल्या प्लेईंग ११मध्ये किती बदल करणार. 

भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानच्या मते दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी संघात जास्त बदलाची शक्यता कमी आहे. याचे कारण म्हणजे पहिल्या सामन्यात अनेक खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. भले या सामन्यातून पंत, कोहली, बुमराह आणि जडेजासारखे खेळाडू पुनरागमन करत अतील मात्र झहीर खानच्या मते कर्णधार रोहित शर्मा प्लेईंग ११मध्ये जास्त बदल करणार नाही. 

झहीर खानने क्रिकबझशी बोलताना सांगितले, येथे बसून सांगणे कठीण आहे की निवडीमध्ये कोणता संघ निवडला जाईल. तुम्ही पाहिले की भारताने मालिकेतील पहिला सामना जिंकला आणि त्यानंतर उरलेल्या मालिकेत कोणताही बदल झाला नाही. मला नाही वाटत की काही बदल केला जाईल. जर झालाच तर एक बदल केला जाईल. आपल्याला पाहावे लागेल की काय बदल होणार आहे. झहीरच्या मते जर संघात बदल झाला तर तो जसप्रीत बुमराहला अर्शदीप सिंहच्या जागी आणणे असेल. 

अधिक वाचा - भारतात सापडला नवीन सब-वॅरिएंट

झहीर खानच्या मते दुसऱ्या टी-२०साठी प्लेईंग ११ - इशान किशन, रोहित शर्मा (कर्णधार), दीपक हूडा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, दिनेश कार्तिक, हर्षल पटेल, भुवनेश्‍वर कुमार, युजवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराह. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी