IPL 2022: लखनऊ, अहमदाबाद नव्हे तर मेगा लिलावात या संघासोबत जाणार लोकेश राहुल

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 10, 2022 | 12:52 IST | टाइम्स नाऊ मराठी

lokesh rahul: यंदाची आयपीएल स्पर्धा अनेक बाबतीत खास असणार आहे. आयपीएलच्या या १५व्या हंगामात अनेक खेळाडू लिलावात दिसणार आहेत. तसेच या आयपीएलध्ये २नवे संघ या स्पर्धत खेळत आहेत. त्यामुळे या स्पर्धेतील संघांची संख्या १० होणार आहे. 

lokesh rahul
लखनऊ, अहमदाबाद नव्हे तर मेगा लिलावात या संघासोबत जाणार राहुल 
थोडं पण कामाचं
  • लोकेश राहुलने आधीही पंजाबचे नेतृत्व केले आहे.
  • गेल्या वर्षी आयपीएल २०२२साठी झालेल्या रिटेंशन प्रक्रियेत लोकेश राहुलला जुनी फ्रेंचायझी पंजाब किंग्सला रिटेन केले नव्हते.
  • फ्रेंचायझीकडून बातमी आली की २९ वर्षीय विकेटकीपर फलंदाज संघासोबत राहू इच्छित नाही आणि फ्रेंचायझीने त्याच्या निर्णयाचा सन्मान केला.

मुंबई: आयपीएल २०२२(ipl 2022)मध्ये नव्या संघांची घोषणा झाल्यानंतर भारताच्या अनेक स्टार खेळाडूंची नावे या संघांशी जोडली जात आहेत. खयातच बंगळुरूचा २९ वर्षीय सीनियर विकेटकीपर फलंदाज लोकेश राहुलही(lokesh rahul) चर्चेत आहे की तो लखनऊ(lucknow) संघाचा स्टार बनू शकतो. मात्र काही रिपोर्ट्सनुसार लोकेश राहुल या दोनही संघांसोबत जाणार नसून तिसऱ्याच संघाचा कर्णधार होणार आहे. not ahmedabad or lucknow, lokesh rahul will go woth this team in ipl 2022

या संघाचा कर्णधार होणार?

गेल्या वर्षी आयपीएल २०२२साठी झालेल्या रिटेंशन प्रक्रियेत लोकेश राहुलला जुनी फ्रेंचायझी पंजाब किंग्सला रिटेन केले नव्हते. फ्रेंचायझीकडून बातमी आली की २९ वर्षीय विकेटकीपर फलंदाज संघासोबत राहू इच्छित नाही आणि फ्रेंचायझीने त्याच्या निर्णयाचा सन्मान केला. नुकतेच पंजाब िंग्सच्या मॅनेजमेंटकडून सागण्यात आले की लोकेश राहुल कर्णधार म्हणून सोबत राहावा मात्र राहुलने यावर कोणताही प्रतिक्रिया दिली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार आता अशी बातमी आहे की लोकेश राहुल पुन्हा आयपीएल २०२२मध्ये पंजाब किंग्सचा हात हातात घेऊ शकतो. 

लोकेश राहुलने आधीही पंजाबचे नेतृत्व केले आहे. जर किंग्स मॅनेजमेंट त्याला मनवण्यात यशस्वी ठरली तर तो पुन्हा पंजाबकडून खेळताना दिसू शकतो. त्याने कर्णधार असताना गेल्या वर्षी आयपीएलध्ये पंजाबसाठी विस्फोटक अंदाजात फलंदाजी करताना धावा केल्या होत्या. त्याचे नेतृत्वकौशल्य पाहता तसेच शानदार फलंदाजी पाहता पंजाब किंग्स पुन्हा त्याच्याकडे नेतृत्व देईल. 

य़ा तारखेला सुरू होऊ शकते आयपीएल

बीसीसीआयने आतापर्यंत मेगालिलावाच्या तारखांची अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे आय़पीएल शेड्यूल्डतर नंतरची गोष्ट आहे. यात अशी बातमी समोर येत आहे की आयपीएल २०२२चे आयोजन एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात केले जाऊ शकते. क्रिकेटनेक्सच्या बातमीनुसार आयपीएलचे पहिले दोन सामने दोन एप्रिलला आयोजित केले जाऊ शकतात. २००९ पासून आतापर्यंत एखादे वर्ष सोडले तर अनेकदा सीझनमधील  पहिला सामना दोन्ही संघादरम्यान खेळले जातात जे गेल्या वर्षीच्या फायनलमध्ये खेळलेले संघ असतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी