अंडर १९ वर्ल्डकपमध्ये खेळतायत एक नव्हे तर दोन भारतीय संघ, तुमचे मन जिंकेल ही बातमी

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 17, 2022 | 15:47 IST | टाइम्स नाऊ मराठी

U19 world cup: वेस्ट इंडिजच्या यजमानपानाखाली खेळवल्या जात असलेल्या अंडर १९ वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाशिवाय इतर संघांमध्ये भारतीय वंशाचे खेळाडू भरपूर आहेत. सर्व संघातील भारतीय खेळाडू एकत्र केल्यास भारतीय खेळाडूंचा दुसरा संघ तयार होईल. 

u19 world cup 2022
अंडर १९ वर्ल्डकपमध्ये खेळतायत एक नव्हे तर दोन भारतीय संघ 
थोडं पण कामाचं
  • यूएई आणि कॅनडाच्या संघात भारतीय खेळाडूंचा भरणा
  • कॅनडा आणि यूएई संघाचे कर्णधारपद भारतीय वंशाच्या खेळाडूंमध्ये 
  • ऑस्ट्रेलियाच्या संघात २ तर इंग्लंडच्या संघात १ भारतीयाचा समावेश

गयाना: वेस्ट इंडिजच्या(west indies host) यजमानपदाखाली खेळवल्या जात असलेल्या अंडर १९ वर्ल्डकपमध्ये(u19 world cup) १६ देशांनी सहभाग घेतला आहे. स्पर्धेच्या आतापर्यंतच्या इतिहासात भारतीय संघ(team india) पाचव्यांदा खिताब जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरत आहे. टीम इंडियाने स्पर्धेची सुरूवातही जबरदस्त केली आहे. त्यांनी द. आफ्रिकेला(south africa) पहिल्याच सामन्यात ४५ धावांनी हरवले. स्पर्धेतील आणखी एक बाब जगभरातील क्रिकेट चाहत्यांना आकर्षित करत आहे. स्पर्धेत भारताशिवाय भाग घेतलेल्या इतर १५ संघांपैकी ५ संघ असे आहेत ज्यात कमीत कमी एक खेळाडू भारतीय वंशाचा आहे. भारतीय संघातील खेळाडूंशिवाय स्पर्धेत इतर संघात अनेक भारतीय वंशाचे खेळाडू आहेत. हे सर्व खेळाडू एकत्र केले तर आणखी एक संघ बनू शकतो. Not only one two indian team playing in u19 world cup 2022

भारतीय वंशाचे खेळाडू कॅनडा, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, स्कॉटलंड आणि यूएई या संघांमध्ये आहेत. भारतीय वंशाचे सर्वाधिक खेळाडू कॅनडा आणि यूएईच्या संघात आहेत. हे संघ या खेळाडूंवर अवलंबून आहेत. भारतीय वंशाचे खेळाडू या दोन संघांचे कर्णधारही आहेत. याशिवाय ऑस्ट्रेलियाच्या संघातही दोन भारतीय वंशाच्या खेळाडूंना स्थान मिळाले आहे. 

कॅनडा 

कॅनडाने अंडर १९ वर्ल्डकपसाठी जो संघ पाठवला आहे त्यात अधिकाधिक खेळाडू भारतीय वंशाचे आहेत. संघाचे नेतृत्व मूळचा गुजराती असलेल्या मिहिर पटेलच्या हाती आहे. संघात भारतीय वंशाचे जश शाह, अनुप चीमा, गुरनेक जोहल सिंह, कैरव शर्मा, शील पटेल, परमवीर खरोड, हरजप सैनी, अर्जुन सुखु, मोहित पराशर, सिद्ध लाड आणि समवीर धालीवल यांना स्थान मिळाले आहे. 

यूएई

यूएई क्रिकेट बोर्डाच्या अंडर १९ वर्ल्डकप संघात भारतीय वंशाच्या अनेक खेळाडूंना स्थान दिले आहे. केरळमध्ये जन्मलेल्या अलिशान सराफूच्या हाती संघाचे नेतृत्व आहे. तर आर्यांश शर्मा, ध्रुव पराशर, पुण्य मेहरा, नीलांश केसरवानी, आदित्य शेट्टी, यश गियानी, विनायक राघवन आणि शिवल बावा यांना स्थान मिळाले आहे. यूएईचा संघही कॅनडाच्या संघाप्रमाणेच भारतीय वंशाच्या खेळाडूंवर अवलंबून आहे. 

ऑस्ट्रेलिया

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात दोन भारतीय वंशाच्या खेळाडूंना स्थान दिले आहे. हे दोन खेळाडू हरकीरत बाजवा आणि निवेथन राधाकृष्णन . निवेथन राधाकृष्णन हा दिल्ली कॅपिटल्समध्ये नेट बॉलरही राहिला आहे. तर हरकीरत ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्डकप संघात सामील असलेला सगळ्यात कमी वयाचा खेळाडू आहे. 

इंग्लंड

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने अंडर १९ वर्ल्डकप संघात भारतीय वंशाचा खेळाडू फतेह सिंहला स्थान दिले आहे. स्पिन गोलंदाज फतेह सिंह संघात ऑलराऊंडर म्हणून खेळतो. रवींद्र जडेजा त्याचा आदर्श आहे. त्याचे कुटुंबीय १९६५मध्ये ब्रिटनमध्ये आले होते. 

स्कॉटलंड

स्कॉटलंडने अंडर १९ वर्ल्डकपसाठी आपल्या संघात भारतीय वंशाच्या आयुष दास महापात्राला सामील केले आहे. भारताच्या ओडिशा येथील मूळचा असलेला आयुष ऑलराऊंडर आहे. बॅटिंगसह तो स्पिन गोलंदाजीही करतो. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी