Rohit Sharma: निवृत्ती घेण्याची वेळ आली आहे, रोहित शर्माचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर चांगलेच भडकले चाहते

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Aug 26, 2022 | 14:30 IST | टाइम्स नाऊ मराठी

Rohit Sharma: रोहित शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ समो आल्यानंत चाहते त्याला ट्रोल करतायत आणि रिटायरमेंट घेण्याचा सल्ला देतायत. 

rohit sharma
निवृत्ती घेण्याची वेळ आलीये, रोहितच्या व्हिडिओवर भडकले चाहते 
थोडं पण कामाचं
  • बीसीसीआयने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून रोहित शर्माचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
  • यात तो स्केटिंग स्कूटर चालवताना दिसत आहे.
  • रावानंतर रोहित शर्मा आपल्या स्टाईलमध्ये मजा करताना दिसतोय.

मुंबई: भारतीय संघ सध्या आशिया कपमध्ये(asia cup) खेळण्यासाठी दुबईत आहे. भारत(india) आणि पाकिस्तान(pakistan) यांच्यात आशिया कपमध्ये २८ ऑगस्टला सामना होत आहे. यासाठी दोन्ही संघांनी आपली तयारी केली आहे. भारताने सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकला आहे. आता रोहित शर्माचा एक व्हिडिओ व्हायरल(video viral) होत आहे. ते पाहता चाहते खूपच भडकले आहेत. Now its time to retire, fans trolls Rohit on social media

अधिक वाचा - शनी अमावस्येला या राशीच्या लोकांनी करा हे उपाय...

व्हायरल होतोय व्हिडिओ

बीसीसीआयने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून रोहित शर्माचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो स्केटिंग स्कूटर चालवताना दिसत आहे. यासोबतच बीसीसीआयने लिहिले, सरावानंतर रोहित शर्मा आपल्या स्टाईलमध्ये मजा करताना दिसतोय. हा व्हिडिओ काही चाहत्यांना आवडलाय तर काही लोकांनी त्याला खास कारणावरून ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. एका युझरने कमेंटमध्ये लिहिले, तुम्ही वर्षात एक अथवा दोन सामने खेळता. आता दुखापत नको. आता पंतला कर्णधार बनवण्याची वेळ आली आहे. 

जबरदस्त फलंदाज आहे रोहित शर्मा

रोहित शर्मा आपल्या विस्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. त्याच्याकडे ती कला आहे जो काही दिवसांत सामन्याचे चित्र बदलू शकतो. रोहित शर्मा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने नेहमीच टीम इंडियाला मजबूत सुरूवात करून दिली आहे. 

अधिक वाचा - ब्लॅकमेलिंगचा बळी ठरल्या सोनाली फोगाट

पाकिस्तानविरुद्ध होणार सुरूवात

भारतीय संघाला या वर्षी ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपमध्ये भाग घेणार आहे..यासाठी आशिया कपमध्ये भारतीय संघाची अग्नीपरीक्षा आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारत आशिया कप जिंकण्यासाठीचा प्रबळ दावेदार आहे. भारताने आशिया कपमध्ये सर्वाधिक खिताब जिंकले आहेत. श्रीलंका संघाने पाच वेळा आणि पाकिस्तानने केवळ दोन वेळा आशिया कप जिंकला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी