Team india captain: कोहलीनंतर आता हा क्रिकेटर होणार टी-२० कॅप्टन

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 02, 2021 | 12:21 IST | टाइम्स नाऊ मराठी

new captain of team india: विराटने आधीच टी-२० वर्ल्डकपनंतर कर्णधारपद सोडण्यचा निर्णय घेतला आहे. त्याने वर्कलोडचे कारण सांगत बीसीसीआयला आपला राजीनामा पाठवला होता. 

rohit sharma
आता रोहित बदलणार टीम इंडियाचा चेहरामोहरा 
थोडं पण कामाचं
  • २०१७ मंतर पहिल्यांदा टीम इंडियामध्ये दोन कर्णधार असतील.
  • याआधी २०१४ ते २०१७ या कालावधीत भारतीय संघात दोन कर्णधार होते.
  • आता कोहली टी-२०चे नेतृत्व सोडल्यानंतर रोहित आणि कोहली भारताचे दोन वेगवेगळे कर्णधार असतील. 

मुंबई: रोहित शर्मा(rohit sharma) टी-२०(t-20) आणि वनडेसाठी(one day) टीम इंडियाचा(team india) नवा कर्णधार(captain) असणार आहे. लवकरच निवड समितीच्या बैठकीत रोहितच्या नावावर अखेरचे शिक्कामोर्तब केले जाईल. स्पोर्ट्सच्या वेबसाईड इनसाईड स्पोर्ट्सने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या(bcci) सूत्रांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान, विराट कोहली कसोटी संघाचा कर्णधार असेल असेही सांगण्यात आले आहे. Now Rohit Sharma will be captain of t-20 and one day team

रिपोर्टनुसार बीसीसीआय अधिकाऱ्यांनी तीनही फॉरमॅटसाठी वेगवेगळ्या कर्णधाराची निवड कऱणाऱ्या वृत्ताचे खंडन केले आहे. विराटने आधीच टी-२० वर्ल्डकपनंतर कर्णधारपद सोडण्यचा निर्णय घेतला आहे. त्याने वर्कलोडचे कारण सांगत बीसीसीआयला आपला राजीनामा पाठवला होता. 

कोहलीने सोशल मीडियावर आपल्या टी-२० कर्णधारपदावरून निवृत्तीची घोषणा करताना सांगितले होते की तो अनेक वर्षांपासून भारतासाठी तीनही फॉरमॅटमध्ये खेळत आहे. तर मागील काही वर्षांपासून तीनही फॉरमॅटमध्ये नेतृत्वही करत आहे. त्याच्यावर वर्कलोड खूप जास्त आहे. अशातच वनडे आणि कसोटी संघाच्या नेतृत्वावर लक्ष देण्यासाठी तो टी-२० चे कर्णधारपद सोडत आहे आणि एक फलंदाज म्हणून टी-२० क्रिकेटमध्ये खेळत राहील. 

वर्ल्डकपनंतर न्यूझीलंडचा भारत दौरा

टी-२० वर्ल्डकपनंतर न्यूझीलंडचा संघ भारत दौरा करणार आहे. न्यूझीलंडचा संघ येथे तीन टी-२० आणि २ कसोटी सामने खेळणार आहे. १७ नोव्हेंबरला जयपूरमध्ये पहिला टी-२० सामना होणार आहे. त्यानंतर १९ नोव्हेंबरला रांचीमध्ये होणार आहे तर तिसरा सामना २१ नोव्हेंबरला कोलकातामध्ये होणार आहे. यानंतर २५-२९ नोव्हेंबरपर्यंत कानपूरमध्ये पहिली कसोटी आणि ३-७ डिसेंबरदरम्यान दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येईल. 

२०२३ पर्यंत दोन वर्ल्डकप

२०२३ पर्यंत दोन वर्ल्डकप होणार आहे. २०२२मध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर टी-२० वर्ल्डकप खेळवला जाणार आहे.तर २०२३मध्ये वनडे वर्ल्डकप भारतात होणार आहे. या मोठ्या स्पर्धांआधी रोहितला आपला संघ तयार करण्यासाठी संपूर्ण संधी मिळेल. ऑस्ट्रेलियातील मोठी मैदाने लक्षात घेता रोहित शर्मा चांगली टीम तयार करू शकतो. सोबतच मोठ्या स्पर्धांमधील जिंकण्याचा त्याचा अनुभवही संघासाठी फायदेशीर होईल.  

२०१७नंतर टीम इंडियामध्ये असणार दोन कॅप्टन

२०१७ मंतर पहिल्यांदा टीम इंडियामध्ये दोन कर्णधार असतील. याआधी २०१४ ते २०१७ या कालावधीत भारतीय संघात दोन कर्णधार होते. धोनीने २०१४मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती आणि कोहली नवा कर्णधार होता. तर धोनी वनडे आणि टी-२०चा कर्णधार होता. यानंतर कोहलीने २०१७ पासून तीनही फॉरमॅटमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. आता कोहली टी-२०चे नेतृत्व सोडल्यानंतर रोहित आणि कोहली भारताचे दोन वेगवेगळे कर्णधार असतील. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी