NZ Vs Aus t20 Match Prediction : आज ऑस्ट्रेलिया अन् न्यूझीलंडमध्ये रंगणार सामना; कोण असेल टी20 चा चॅम्पियन? कोण घरी नेणार कप?

New zealand Vs Australia Final Match Prediction : ऑस्ट्रेलिया (Australia Team) आणि न्यूझीलंड संघ (New Zealand Team) पहिल्यांदा आयसीसीच्या टी-२० (ICC T20) फॉरमॅटमध्ये विश्वविजेत्याचा बहुमान आपल्या नावे करण्यासाठी आज रविवारी मैदानावर उतरणार आहेत.

NZ Vs Aus t20 Match
T20 WC Final NZ vs AUS : कोण असेल टी20 चा चॅम्पियन?   |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी आजवर एकदाही टी20 चा विश्वचषक जिंकलेला नाही.
  • 2015 मधील पराभवाचा वचपा काढण्याची संधी संयमी न्यूझीलंड संघाकडे.
  • ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघातील मधली फळी कमकवूत

New zealand Vs Australia Final Match Prediction : दुबई : ऑस्ट्रेलिया (Australia Team) आणि न्यूझीलंड संघ (New Zealand Team) पहिल्यांदा आयसीसीच्या टी-२० (ICC T20) फॉरमॅटमध्ये विश्वविजेत्याचा बहुमान आपल्या नावे करण्यासाठी आज रविवारी मैदानावर उतरणार आहेत. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी आजवर एकदाही टी20 चा विश्वचषक जिंकलेला नाही. पण यंदा दोन्ही संघांना ती संधी आज चालून आली आहे. आज सायंकाळी साडेसात वाजता दुबई (Dubai) च्या मैदानावर टी-20 चा नवा चॅम्पियन कोण असेल हे कळणार आहे. दरम्यान ऑस्ट्रेलिया मात्र दुसऱ्यांदा अंतिम सामन्यात पोहचली आहे. मात्र, न्यूझीलंड प्रथमच अंतिम फेरीत खेळणार आहे. दोन्ही संघ तुल्यबळ आगेत, पण दुबईतल्या मैदानात कोण जिंकणार? हे सामन्याआधीच्या नाणेफेकीवरही तितकेच अवलंबून असेल. 

उपांत्य सामन्यात न्यूझीलंड संघाने इंग्लंडचा तर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे. दोन्ही संघाच्या जेतेपदावर नजरा असतील. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया 2015 मध्ये एकदिवसीय विश्वचषकातील अंतिम सामन्यात एकमेंकासमोर आले होते. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली होती. त्यानंतर सहा वर्षानंतर दोन्ही संघ अंतिम सामन्यासाठी एकमेंकासमोर उभे राहिले आहेत. 2015 मधील पराभवाचा वचपा काढण्याची संधी संयमी न्यूझीलंड संघाकडे चालून आली आहे. 

साखळी फेरीमध्ये न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी केली होती. उपांत्य सामन्यात फलंदाजांनीही दमदार पुनरागमन केले आहे. ट्रेंट बोल्ट, टिम साऊदी, अ‍ॅडम मिल्ने या वेगवान त्रयीसह इश सोधी आणि मिचेल सँटनर ही फिरकी जोडी न्यूझीलंडच्या संघाची ताकद आहे. तर  ऑस्ट्रेलिया संघात फलंदाजी आणि गोलंदाजी एकापेक्षा एक सरस खेळाडूंचा भरणा आहे. फिंच-वॉर्नर जगातील सर्वोत्कृष्ट सलामी जोडीपैकी एक आहे. त्यानंतर मार्श, मॅक्सवेल, स्मिथ, स्टॉयनिस आणि वेडसारखे आक्रमक आणि दर्जेदार फलंदाज आहेत. गोलंदाजीतही स्टार्ट, हेजलवूड आणि कमिन्स या त्रिकुटाच्या जोडीला फिरकीपटू जम्पा भन्नाट फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे आजचा सामना रोमांचक होईल, यात शंका नाही. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंच याने टी-20 विजेतेपद जिंकू, असा विश्वास व्यक्त केला आहे. स्पर्धा सुरू होण्याआधी आम्हाला कमी आखल्याची खंतही फिंचने एका परिषदेत व्यक्त केली. 

दोन्ही संघांतील मधली फळी कमकुवत

ऑस्ट्रेलियाची मधली फळी सर्वात कमजोर आहे. उपांत्य सामन्यात पाकविरुद्ध हे जगजाहीर झाले. मधल्या फळीने दक्षिण आफ्रिका व इंग्लंडविरुद्ध संघर्ष केला होता. मार्श, स्टोइनिस व वेडने उत्कृष्ट कामगिरी केली. त्यामुळे स्मिथवर दबाव असेल. कॉन्वे नसल्याने न्यूझीलंडसाठी चिंतेची बाब आहे. त्याच्यामुळे मधली फळी मजबूत होती. संघाची मधली फळी पाक, स्कॉटलंड व नामिबियाविरुद्ध अपयशी राहिली आहे. यामुळे कॉन्वेच्या अनुपस्थितीत संघाला संघर्ष करावा लागू शकतो.

दोन्ही संघासाठी काय असेल डोकेदु:खी

ऑस्ट्रेलियाला सोढी व सँटनर या फिरकी जोडीचा मोठा धोका आहे. ते फलंदाजांना मोकळेपणाने खेळू देत नाहीत. त्यांचा सामना कदाचित  ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू वेड चांगल्या प्रकारे करू शकतो. न्यूझीलंडसाठी चिंता हेजलवूड आणि स्टार्क यांची सलामीची गोलंदाजी जोडी असेल. हेजलवूड गोलंदाजीतून धावा मिळवणे कठीण असते. स्टार्कच्या यॉर्कर आणि वेगामुळे ऑस्ट्रेलियाला सामन्यात फायदा होतो. झम्पाच्या लेगस्पिनमुळे फलंदाज अडचणीत येतात.

४४ सामन्यांत २८ वेळा  आव्हानाचा पाठलाग करणारा संघ ठरलाय विजेता

या सामन्यात नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला लक्ष्याचा पाठलाग करायला आवडेल. कारण सध्याच्या विश्वचषकात आतापर्यंत ४४ सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी २८ सामने पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. यामुळेच सामन्याआधी नाणेफेक जिंकण्यावरच सामन्यात विजय मिळवणं अवलंबून आहे. 

विश्वविजेत्यांसह न्यूझीलंड होईल नंबर वन टी-२० संघ

विलिम्यसन अँड कंपनी सध्या जगाच्या क्रिकेटवर राज्य करत आहे. तो कसोटीत जगज्जेता आहे आणि क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. एकदिवसीय क्रमवारीतही संघ अव्वल स्थानावर आहे. न्यूझीलंड रविवारी टी-२० चा वर्ल्ड चॅम्पियन बनला तर या लहान प्रकारातही तो नंबर-१ वर पोहोचेल. असे झाल्यास न्यूझीलंड हा तिन्ही प्रकारात अव्वल स्थान गाठणारा पहिला संघ ठरेल.

कधी अन् कुठे पाहाल सामना 

दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर सायंकाळी सात वाजता नाणेफेक होणार आहे. साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होईल. हा सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट 1 या चॅनलवर असेल. शिवाय हॉटस्टारवरही सामना पाहू शकता.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी