IND vs PAK: भारत-पाक सामन्याआधी हरभजन सिंगने ट्विटरवर उडवली शोएब अख्तरची खिल्ली

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Oct 18, 2021 | 13:19 IST | टाइम्स नाऊ मराठी

Harbhajan Singh trolls Shoaib Akhtar on twitter:भारताचा अनुभवी ऑफ स्पिनर हरभजन सिंगने टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्याआधी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरची खिल्ली उडवली आहे. 

harbhajan and shoaib
IND vs PAK: हरभजन सिंगने ट्विटरवर उडवली शोएब अख्तरची खिल्ली 
थोडं पण कामाचं
  • हरभजन सिंगने ट्विटरवर शोएब अख्तरची खिल्ली उडवली
  • भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी रंगणार टी-२० वर्ल्डकपचा सामना
  • यूएईमध्ये होतोय टी-२० वर्ल्डकप

मुंबई: आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायवोल्टेज सामन्याआधी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाला वॉकओव्हर देण्याचा सल्ला देणाऱ्या हरभजन सिंगने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरची खिल्ली उडवली आहे. माजी वर्ल्डकप चॅम्पियन भारत आणि पाकिस्तान यांच्यात आयसीसी टी-२० वर्ल्डकपचा सामना दुबईत खेळवला जाणार आहे. या सामन्याची चाहत्यांना भारीच उत्सुकता आहे. भारत १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबरपर्यंत यूएई आणि ओमानमध्ये टी-२० वर्ल्डकपचे आयोजन करत आहे. 

अनुभवी ऑफ स्पिनर हरभजन सिंग आणि माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर टी-२० वर्ल्डकप तज्ञ आणि विश्लेषक संघाचा भाग आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांमध्ये हरभजन सिंग आणि शोएब अख्तर यांच्यात अनेकदा वाद पाहायला मिळाले. तर मैदानाबाहेर दोघेही एकमेकांचा मान ठेवतात. 

हरभजन सिंगने शोएब अख्तरची ट्विटरवर खिल्ली उडवली आहे. खरंतर टी-२० वर्ल्डकपआधी भारत-पाकिस्तान सामन्यावर विचार विमर्श करताना शोएब अख्तरने हरभजन सिंगसोबत एक फोटो शेअर केला होता. अख्तरने ट्वीट केले With Mr. I know it all 
@harbhajan_singh in Dubai for a pre discussion about the mother of all competitions. 

यावर उत्तर देतना पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाजाला आपल्या रेकॉर्डची आठवण करून दिली. त्याने उत्तर देताना म्हटले की, When u have 400 plus test wickets  am sure you know more about cricket then someone with less then 200 wickets. 

हरभजन सिंगने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सांगितले होते, मी शोएब अख्तरला सांगितले की आमच्याविरुद्ध खेळण्याचा काय अर्थ आहे? तुम्ही आम्हाला वॉकओव्हर दिला पाहिजे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारी टीम इंडिया २४ ऑक्टोरला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याद्वारे या स्पर्धेला सुरूवात करणार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी सोमवारी भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध सराव सामना खेळणार आहे.  


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी