लुसाने: Neeraj Chopra Win: ऑलिम्पिक चॅम्पियन भालाफेकपटू (Olympic champion javelin thrower) नीरज चोप्राने (Neeraj Chopra) आणखी एक ऐतिहासिक कामगिरी केली. नीरज चोप्रा लुसाने डायमंड लीग 2022 (Diamond League 2022) जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे. नीरज चोप्राने 89.08 मीटरच्या पहिल्या थ्रोने लुसाने डायमंड लीग (Lausanne Diamond League) जिंकली. या कामगिरीनंतर नीरजने ज्युरिख येथे 7 आणि 8 सप्टेंबर रोजी होणाऱ्या डायमंड लीगच्या फायनलमध्येही प्रवेश केला आहे. (Olympic champion javelin thrower Neeraj Chopra first Indian to win Lausanne Diamond League)
गेल्या महिन्यात झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेत रौप्यपदक जिंकताना नीरज चोप्राच्या पाठीला दुखापत झाली आणि देशाला मोठा धक्का बसला. त्यामुळे चोप्रानं स्पर्धेतून माघार घेतली. त्यानंतर चोप्राने महिनाभर विश्रांती घेतली. मात्र आता नीरज चोप्राने आपल्या एका थ्रोनं अप्रतिम कामगिरी केली आहे. मैदानावर दमदार कमबॅक करताना त्याने इतिहास रचला.
अधिक वाचा- नायगाव रेल्वे स्थानकात सुटकेसमध्ये आढळला अल्पवयीन मुलीचा मृतदेह, खुनाचे कारण अस्पष्ट
वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी पात्र
या ऐतिहासिक थ्रोसह तो पुढील वर्षी बुडापेस्ट, हंगेरी येथे होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरला आहे. नीरजने पहिल्याच प्रयत्नात 89.08 मीटर भालाफेक केला, हा त्याच्या कारकिर्दीतील तिसरा सर्वोत्तम प्रयत्न आहे. डायमंड लीगचे विजेतेपद पटकावणारा नीरज हा पहिला भारतीय ठरला आहे. त्याच्या आधी, डिस्कस थ्रोअर विकास गौडा हा डायमंड लीग मीटच्या टॉप 3 मध्ये स्थान मिळवणारा एकमेव भारतीय होता.
HE'S DONE IT!🇮🇳 — Inspire Institute of Sport (@IIS_Vijayanagar) August 26, 2022
IIS athlete #NeerajChopra becomes the FIRST EVER Indian to win at the Diamond League, finishing top of the pile at the #LausanneDL with a MASSIVE throw of 89.08m in his very first attempt⚡️
He qualifies for the Diamond League final, in Zurich. #CraftingVictories pic.twitter.com/zbxbqrlWnD
पहिल्या थ्रोमध्ये आघाडीवर
24 वर्षीय नीरजने पहिल्याच प्रयत्नात आघाडी घेतली आणि दुसऱ्या प्रयत्नात 85.18 मीटरचा थ्रो फेकला. तिसऱ्या प्रयत्नात तो सहभागी झाला नाही आणि चौथ्या प्रयत्नात फाऊल झाला. नीरजने पुन्हा पाचवा प्रयत्न सोडला. तर सहाव्या आणि शेवटच्या प्रयत्नात त्याने 80.04 मीटर फेक केली. पहिल्या तीनमध्ये असलेल्यांनाच सहाव्या प्रयत्नात संधी मिळते. नीरजला सहापैकी केवळ तीनच प्रयत्नांत गोल करता आला, पण पहिल्याच प्रयत्नाच्या जोरावर त्याने सुरुवातीपासून शेवटपर्यंत आघाडी कायम ठेवली.
दुखापतीमुळे नीरज CWG स्पर्धेतून आऊट
नीरजने गेल्या महिन्यात वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 88.13 मीटर फेक करून ऐतिहासिक रौप्यपदक जिंकले होते. त्यादरम्यान नीरजला दुखापत झाली होती. यानंतर मेडिकल टीमनं नीरज चोप्राला चार-पाच आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला, त्यानंतर त्यांनी बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्स 2022 मधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. दुखापतीतून सावरण्यासाठी नीरजने जर्मनीमध्ये रिहैबिलिटेशनचा कालावधी पार केला. त्यानंतर त्यानं आता पुन्हा दमदार कमबॅक केलं आहे.