khelratna award:ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा आणि मिताली राज यांचं खेलरत्न पुरस्कारासाठी नामांकन

khelratna award:भालाफेकपटू नीरज चोप्रासह 11 खेळाडूंची खेलरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. नीरजने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. महिला कसोटी आणि एकदिवसीय संघाची कर्णधार मिताली राजचे नावही या यादीत आहे.

Neeraj Chopra and Mithali Raj nominated for Khel Ratna
नीरज चोप्रासह 11 खेळाडूंची खेलरत्नसाठी निवड   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भालाफेकपटू नीरज चोप्राची खेलरत्नसाठी निवड
  • मिताली राजचेही नावही यादीत...
  • अर्जुन पुरस्कारासाठी 35 खेळाडुंची शिफारस..

नवी दिल्ली : khelratna award : खेलरत्न पुरस्कारासाठी भालाफेकपटू नीरज चोप्रासह 11 खेळाडूंच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार समितीने भारतातील सर्वोच्च क्रीडा सन्मान मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी खेळाडूंच्या नावाची शिफारस केली. टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भालाफेकमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा, रवी दहिया, पीआर श्रीजेश आणि लव्हलिना बोरगोहाई या ऑलिम्पिक पदक विजेत्यांचा या यादीत समावेश आहे. सुनील छेत्रीसह ज्येष्ठ भारतीय महिला क्रिकेटपटू मिताली राज हिलाही सर्वोच्च सन्मानासाठी नामांकन देण्यात आले आहे.


२०२१ हे वर्ष भारतासाठी खास होते, जिथे अनेक खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिक २०२० तसेच टोकियो पॅराऑलिम्पिक २०२० मध्ये देशाचा गौरव केला. 
पॅराऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरलेली भारतीय पॅराऑलिम्पियन अवनी लेखरा हिच्या नावाचीही शिफारस करण्यात आली आहे. पॅराऑलिम्पिक 2020 मध्ये F64 पॅरा भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या सुमित अंतिलच्या नावाचीही खेलरत्नसाठी शिफारस करण्यात आली आहे. यासोबतच अर्जुन पुरस्कारासाठी ३५ भारतीय खेळाडूंची नावे पाठवण्यात आली आहेत.

या 11 खेळाडूंना खेलरत्न मिळू शकतो

रज चोप्रा (अॅथलेटिक्स), रवी दहिया (कुस्ती), पीआर श्रीजेश (हॉकी), लोव्हलिना बोरगोहेन (बॉक्सिंग), सुनील छेत्री (फुटबॉल), मिताली राज (क्रिकेट), प्रमोद भगत (पॅरा बॅडमिंटन), सुमित अंतिल (पॅरा भालाफेक) , अवनी लेखरा (पॅरा नेमबाजी), कृष्णा नगर (पॅरा बॅडमिंटन), एम नरवाल (पॅरा नेमबाजी).

अर्जुन पुरस्काराचे नामांकन


योगेश कथुनिया (डिस्कस थ्रो), निषाद कुमार (उंच उडी), प्रवीण कुमार (उंच उडी), शरद कुमार (उंच उडी), सुहास एलवाय (पॅरा बॅडमिंटन), सिंहराज अंधाना (शूटिंग), भावना पटेल (पॅरा टेबल टेनिस), हरविंदर सिंग (तिरंदाजी), शिखर धवन (क्रिकेट).


छेत्री हा पहिला फुटबॉलपटू ठरला

अनुभवी सुनील छेत्री खेलरत्न पुरस्कारासाठी निवड झालेला देशातील पहिला फुटबॉलपटू ठरला आहे. गेल्या वर्षी खेलरत्न पुरस्कारासाठी पाच खेळाडूंची निवड करण्यात आली होती, तर २०१६च्या रिओ गेम्सनंतर चार खेळाडूंची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी