ऑलिम्पिक : खेळाडूंना दिले जाणार दीड लाख मोफत कंडोम, मात्र वापरासाठी आहेत या सूचना, ऑलिम्पिकची ही खास परंपरा

ऑलिम्पिकच्या परंपरेनुसार ज्या गावात किंवा परिसरात ही स्पर्धा पार पडते तिथे राहणाऱ्या आणि स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडू किंवा अॅथलीटना स्पर्धेच्या काळात मोफत कंडोम (free condoms to Athletes) दिले जातात.

In Tokyo Olympic, 1,60,000 condoms to be distributed
टोकियो ऑलिम्पिकमध्ये होणार दीड लाख कंडोमचे मोफत वाटप 

थोडं पण कामाचं

  • ऑलिम्पिकमधील खास परंपरा
  • टोकियो ऑलिम्पिकमध्ये होणार १,६०,००० कंडोमचे वाटप
  • ऑलिम्पिक समितीने प्रसिद्ध केले कंडोम वापरासाठीचे ३३ पानांचे एक प्लेबुक

नवी दिल्ली : जपानमध्ये टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिकसाठीची (Tokyo Olympic)(Japan) तयारी जोरात सुरू आहे. कोरोना महामारीच्या संकटामुळे (corona pandemic) ऑलिम्पिकचे यशस्वी आयोजन करण्याचे मोठे आव्हान (Big challenge in front of Olympic committee amid corona pandemic) ऑलिम्पिक समितीसमोर आहे. ऑलिम्पिक म्हटले की खेळांचा महाउत्सवच असतो. विविध खेळांशी संबंधित अनेक मुद्दे या काळात चर्चेत असतात. पण ऑलिम्पिकसंदर्भातील आणखी एक खास परंपरा (Special tradition of Olympic) आहे. ऑलिम्पिकच्या परंपरेनुसार ज्या गावात किंवा परिसरात ही स्पर्धा पार पडते तिथे राहणाऱ्या आणि स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडू किंवा अॅथलीटना स्पर्धेच्या काळात मोफत कंडोम (Distribution of free condoms to Athletes) दिले जातात. मोफत वाटले जाणाऱ्या कॉन्डोमची (condom) संख्या थोडीथोडकी नव्हे १,६०,००० कंडोम इतकी आहे. अर्थात यासंदर्भात एक अडचणदेखील आहे. (Olympic : In Tokyo Olympic, 1,60,000 free condoms to be distributed to Athletes)

ऑलिम्पिक समितीच्या खेळाडूंना सूचना

आयोजकांनी खेळ गावात अॅथलीट किंवा खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या मोफत कंडोमच्या वापराला मनाई केली आहे. आयोजन समितीचे म्हणणे आहे की खेळाडू ऑलिम्पिकची आठवण म्हणून हे कंडोम घरी आपल्या देशात घेऊन जायचे आहेत. जपानमध्ये खेळाडूंनी या मोफत दिलेल्या कंडोमचा वापर करण्यास मनाई केली आहे. खेळाडूंनी आपल्या देशात गेल्यावर याचा वापर करावा अशी आयोजन समितीची भूमिका आहे. आयोजकांनी ही भूमिका घेण्यामागे कारण आहे कोरोना महामारीचे. खेळाडूंनी जर कंडोमचा वापर केला तर ते इतरांच्या संपर्कात येऊ शकतात. त्यामुळे कोरोना महामारीचा फैलाव होऊ शकतो. कोरोना महामारीच्या काळात एकमेकांशी संपर्क टाळायचा आहे. त्यामुळे खेळाडूंनी खेळ गावात या कंडोमचा वापर करू नये असे आयोजन समितीचे म्हणणे आहे.

कधी आणि कशी सुरू झाली कंडोमची परंपरा


एचआयव्ही एड्स आणि लैंगिक आजारांना आळा घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने १९८८पासून खेळांदरम्यान कंडोमचे वाटप करण्याची प्रथा सुरू केली. अर्थात मागील ऑलिम्पिकच्या तुलनेत टोकियो ऑलिम्पिकमध्ये कमी कंडोमचे वाटप केले जाणार आहे. याआधीच्या रिओ ऑलिम्पिकच्या काळात ऑलिम्पिक समितीने ४,५०,००० कंडोमचे वाटप केले होते.

२०२१च्या ऑलिम्पिकमध्ये प्रत्येक खेळाडूला मिळणार किती कंडोम


२०२१च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या जवळपास ११,००० खेळाडूंना प्रत्येकी १४ कंडोम ऑलिम्पिक समितीकडून मिळणार आहेत. अर्थात जुने नियम आणि परंपरा ही कोरोना महामारीच्या आधीच्या काळातील आहेत. आता जागतिक अभियानाअंतर्गत कोरोनाला आळा घालण्यासाठी खेळाडूंनी एकमेकांनी कमीत कमी संपर्क ठेवावा अशी सूचना ऑलिम्पिकचे आयोजक खेळाडूंना करत आहेत. ऑलिम्पिक समितीने आपल्या कंडोम कार्यक्रमाची घोषणा करताना ३३ पानांचे एक प्लेबुकदेखील प्रसिद्ध केले आहे. यामध्ये शारीरिक संपर्क टाळण्यासाठी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात आले आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी