सोशल मीडियावर इरफान पठाणने त्याचा मोठा भाऊ युसूफची केली अशी चेष्टा!

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 23, 2020 | 11:16 IST | टाइम्स नाऊ मराठी

पठाण बंधू म्हणून ओळखले जाणारे इरफान आणि युसुफ सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतात आणि वेळोवेळी आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत असतात.

Pathan Brother
पठाण बंधू   |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • पठाण बंधू म्हणून ओळखले जाणारे इरफान आणि युसुफ सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतात
  • जिम सत्रानंतर युसुफ पठाणने स्वत: चा एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला.
  • ३६ वर्षीय इरफान पठाणने प्रतिउत्तरात लिहिले, 'पानी डाला ना?

नवी दिल्ली : पठाण बंधू म्हणून ओळखले जाणारे इरफान आणि युसुफ सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतात आणि वेळोवेळी आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत असतात. हे दोन्ही भाऊ एकमेकांची चेष्टा करतात आणि त्याचे नमुने ट्विटर किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहिले जातात. मोठा भाऊ युसूफ पठाण याने रविवारी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक फोटो पोस्ट केला, ज्यावर इरफान पठाणने त्याची खिल्ली उडविली.

जिम सत्रानंतर युसुफ पठाणने स्वत: चा एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला. यासह, ३८ वर्षीय युसूफ पठाण याने 'निरोगी जीवनासाठी स्वतःवर प्रेम करा' असे कॅप्शन लिहिले. इरफान पठाण यांनी ही संधी साधून आपल्या मोठ्या भावाची चेष्टा केली. माजी अष्टपैलू खेळाडूने आपल्या भावाला विचारले की टी-शर्ट पाण्यात भिजवून आणि नंतर फोटो काढण्यासाठी तू ते पुन्हा परिधान केले आहे का? ३६ वर्षीय इरफान पठाणने प्रतिउत्तरात लिहिले, 'पानी डाला ना?' वास्तविक, इरफान पठाणने असे सूचित केले की, युसूफ पठाणने कठोर परिश्रम न करता फक्त आपली जर्सी पाण्यात भिजविली म्हणजे लोकांना कळेल की त्याने कठोर परिश्रम केले आहेत. इरफान पठाणची ही थट्टा करण्याची शैली होती. त्याचे उत्तर चाहत्यांना खूप आवडले.

इरफान पठाण क्रिकेटमध्ये दिसणार आहे

इरफान पठाण स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतणार आहे. तो लंका प्रीमियर लीगमधील कँडी टस्कर्सचे प्रतिनिधित्व करणार आहे. या माजी वेगवान गोलंदाजाला कुसल परेरा, वहाब रियाज, मुनाफ पटेल आणि कुसल मेंडिस हे आंतरराष्ट्रीय स्टार संघात साथ देतील. यापूर्वी इरफान पठाण आयपीएलमध्ये कॉमेंट्रेटरच्या भूमिकेत होता. इरफान पठाणने आपला शेवटचा सामना मार्चमध्ये खेळला होता जिथे त्याने  इंडियन लीजेंड्सचे प्रतिनिधित्व केले होते. कोरोना व्हायरसमुळे ही स्पर्धा मध्यात रद्द केली गेली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी