मुंबई: इंग्लंडविरुद्धच्या(england) मालिकेतील शेवटच्या वनडेत टीम इंडियाच्या(team india) विजयाचा हिरो ठरला ऋषभ पंत(rishabh pant). ऋषभ पंतने या सामन्यात एका शतकी खेळीने साऱ्यांची मने जिंकली. ऋषभ पंतच्या या खेळीचे चहूबाजूनी कौतुक केले जात आहे. या सगळ्यात सोशल मीडियावर(social media) एक ट्वीट चांगलेच व्हायरल होत आहे. या ट्वीटमध्ये ऋषभ पंतच्या या शानदार खेळीच्या मागचे कारण समोर आले आहे. One tweet reveals about risabh pant matchwinning century
अधिक वाचा - पोटाचा घेर कमी करायचा आहे?, मग करा 'या' गोष्टींचं सेवन
मँचेस्टर वनडेत ऋषभ पंतने ऐतिहासिक खेळी केली. त्याची ही खेळी त्याचे चाहते अजिबात विसरणार नाही. पंतच्या या खेळीनंतर टीम इंडियाचा माजी क्रिकेटर युवराज सिंहचे एक ट्वीट चांगलेच व्हायरल होत आहे. या ट्वीमध्ये युवराजने ऋषभ पंतचे कौतुक करताना लिहिले, असे वाटते की ४५ मिनिटांे बोलणे समजले. चांगला खेळलास पंत, अशीच तुझ्या खेळीला गती दे. हार्दीकची खेळी बघणे शानदार होते. या ट्वीटवरून समजते की त्याने तिसऱ्या वनडे आधी पंतशी ४५ मिनिटे बोलणे केले होते. यामुळेच त्याच्या खेळात चमक आली.
Looks like the 45 minute conversation made sense 😅!! Well played @RishabhPant17 that’s how you pace your ininings @hardikpandya7 great to watch 💪 #indiavseng — Yuvraj Singh (@YUVSTRONG12) July 17, 2022
ऋषभ पंतने या सामन्यात ११०.६१च्या स्ट्राईक रेटने ११३ चेंडूत १२५ धावा केल्या. या खेळी दरम्यान त्याने १६ चौकार आणि २ षटकार ठोकले. या शतकानंतर इंग्लंडच्या धरतीवर शतक ठोकणारा तो दुसरा विकेटकीपर ठरला आहे. तर लक्ष्याचा पाठलाग करत शतक ठोकणाराही दुसरा विकेटकीपर ठरला आहे. याआधी ही कामगिरी एमएस धोनीने केली होती.
अधिक वाचा- सोन्याच्या भावात पुन्हा तेजी, डॉलर उच्चांकीवरून दबावाखाली
भारताने इंग्लंडविरुद्धची मालिका २-१ अशी जिंकली. भारताच्या गोलंदाजी आणि फलंदाजांनी कमाल केली. हार्दिक पांड्याने इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या सामन्यात ७१ धावा केल्या. त्यासोबतच त्याने चार विकेटही घेतल्या. त्याआधी युझवेंद्र चहलनेही आपल्या गोलंदाजीने प्रभावित केले.