Amit Mishra: गर्लफ्रेंडला फिरवण्यासाठी पैसे मागणाऱ्या युझरला अमित मिश्राने असं काही दिलं की...

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Sep 30, 2022 | 17:35 IST | टाइम्स नाऊ मराठी

Amit Mishra on Twitter :टीम इंडियाचा माजी लेग स्पिनर अमित मिश्राकडून एका युझरने गर्लफ्रेंडला फिरवण्यासाठी ऑनलाईन पैसे मागितले. यूपीच्या या खेळाडूने या युझरचे मन मोडले नाही. 

amit mishra
गर्लफ्रेंडसाठी पैसे मागणाऱ्याला मिश्राने अस काही दिलं की... 
थोडं पण कामाचं
  • अमित मिश्राकडून एका युझरने आपल्या गर्लफ्रेंडला फिरवण्यासाठी ऑनलाईन पैसे(online money) मागितले.
  • दरम्यान, युपीच्या या खेळाडूने त्या चाहत्याचे मन मोडले नाही
  • त्याने जितके पैसे मागितले होते त्यापेक्षा जास्त दिले.

मुंबई: सोशल मीडियावर(social media) अनेकदा युझर्स आपल्या तक्रारी करत असतात तर अनेकदा आपल्या आवडत्या खेळाडू अथवा सेलिब्रेटींकडून विविध मागण्या करत असतात. अनेकदा चाहत्यांच्या या मागण्या पूर्ण केल्या जातात तर काहीवेळा तशाच अर्धवट राहता. असेच काहीसे भारताचा माजी स्पिनर अमित मिश्रासोबत(amit mishra) झाले. अमित मिश्राकडून एका युझरने आपल्या गर्लफ्रेंडला फिरवण्यासाठी ऑनलाईन पैसे(online money) मागितले. दरम्यान, युपीच्या या खेळाडूने त्या चाहत्याचे मन मोडले नाही आणि जितके पैसे मागितले होते त्यापेक्षा जास्त दिले. Online user demand 300 rupees from Amit Mishra

अधिक वाचा - 'या' 4 नावांच्या मुली सासरकडील लोकांसाठी असतात खूप भाग्यवान

अखेर घडले तरी काय?

खरंतर, भारताचा माजी क्रिकेटर सुरेश रैना सध्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजचा भाग आहे आणि इंडिया लीजेंड्सचे प्रतिनिधित्व करत आहे. रैनाने सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलिया लीजेंड्सविरुद्ध शानदार कॅच पकडला होता. रैनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा अमित मिश्रानेही आपल्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला. मिश्राने लिहिले, भाई सुरेश रैना, मी तुझी टाईम मशीन उधार घेऊ शकतो का? तुला जुन्या दिवसांप्रमाणे फिल्डिंग करताना बघणे खरंच मंत्रमुग्ध करणारे आहे. 

ऑनलाईन मागितले पैसे

अमित मिश्राच्या या ट्वीटरवर एका युझरने रिप्लायमध्येच पैसे मागितले. त्याने लिहिले, सर ३०० रूपये ट्रान्सफर करा. गर्लफ्रेंडला फिरवायचे आहे.या ट्वीटवर एका दुसऱ्या युझरने यूपीआय मागितले. अमित मिश्राने त्यानंतंर त्या युझरला ५०० रूपये ट्रान्सफर केले. अमितने याचा स्क्रीन शॉट शेअर करताना लिहिले, डन, डेटसाठी ऑल दी बेस्ट. त्यानंतर त्या युझरने अमित मिश्राला धन्यवादही म्हटले. 

अधिक वाचा - बहुप्रतीक्षित 'भेडिया'चा teaser रिलीज

असे होते करिअर

अमित मिश्राने आपल्या करिअरमध्ये 22 कसोटी, 36 वनडे आणि 10 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यांनी कसोटीत 76, वनडेत 64 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये एकूण 16 विकेट घेतल्या. कसोटी फॉरमॅटमध्ये त्याने चार अर्धशतके ठोकली आणि 32 डावांत एकूण 648 धावा ठोकल्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी