Viral Dance: वेस्ट इंडिजमध्ये वाजले ' Oo Antava' गाणे, भारतीयांनी धरला ताल

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Aug 10, 2022 | 12:22 IST | टाइम्स नाऊ मराठी

पुष्पा या सिनेमातील 'उ अंटावा' हे गाणे आजही वाजले तरी पाय थिरकल्याशिवाय राहत नाहीत. केवळ देशातच नव्हे तर देशाबाहेरही या गाण्याची क्रेझ आहे. 

oo anntava
वेस्ट इंडिजच्या स्टेडियममध्ये वाजले ' Oo Antava' गाणे आणि.. 
थोडं पण कामाचं
  • भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाचव्या सामन्यादरम्यान स्टेडियमवर एक वेगळाच माहोल पाहायला मिळाला
  • पुष्पामधील उ अंटावा हे गाणे कुठेही वाजले तरी माणूस नाचल्याशिवाय राहत नाही.
  • या गाण्याची एक वेगळीच नशा पाहायला मिळते. असेच काहीसे चित्र फ्लोरिडामधील स्टेडियममध्ये पाहायला मिळाले. 

मुंबई: वेस्ट इंडिजच्या(west indies) धरतीवर टीम इंडियाने(team india) आपला डंका वाजवला. आधी वनडे मालिका(one day series) आणि त्यानंतर टी-२० मालिकेत त्यांनी आपले वर्चस्व गाजवले. दोन्ही मालिका टीम इंडियाने(team india) सहजरित्या जिंकल्या. वनडे मालिकेचे नेतृत्व शिखर धवनने(shikhar dhawan) केले होते तर टी-२०चे नेतृत्व रोहितने केले. शेवटच्या टी-२० सामन्यात रोहितला आराम दिला आणि त्याच्या ऐवजी हार्दिक पांड्याकडे संघाची धुरा दिली. मात्र विजय टीम इंडियानेच मिळवला. ('Oo Antava' song played in west indies stadium and fans make a dance )

अधिक वाचा - पुण्यात 7 वर्षांच्या चिमुरडीचं अपहरण करून लैंगिक शोषण

दरम्यान, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाचव्या सामन्यादरम्यान स्टेडियमवर एक वेगळाच माहोल पाहायला मिळाला. दरम्यान, पुष्पामधील उ अंटावा हे गाणे कुठेही वाजले तरी माणूस नाचल्याशिवाय राहत नाही. या गाण्याची एक वेगळीच नशा पाहायला मिळते. असेच काहीसे चित्र फ्लोरिडामधील स्टेडियममध्ये पाहायला मिळाले. 

जेव्हा हे गाणे लाँच झाले तेव्हा जगभरातील अनेक रेकॉर्ड या गाण्याने तोडले. अनेक महिन्यांपूर्वी आलेल्या या गाण्याची क्रेझ अद्याप तशीच जिवंत आहे. भारत वि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्यादरम्यानही असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले. फ्लोरिडाच्या स्टेडियममध्ये हे गाणे वाजले आणि प्रेक्षकांनी एकच ताल धरला. 

स्टेडियममधील सर्वच प्रेक्षक या गाण्यावर जबरदस्त नाचू लागले. यावरूनच या गाण्याची किती लोकप्रियता आहे हे समजते. दरम्यान, हे गाणे जेव्हा पहिल्यांदा लोकांसमोर आले होते तेव्हा जबरदस्त हिट झाले. या गाण्यावर अनेक रील्सही सोशल मीडियावर व्हायरल झाले. 

अधिक वाचा - प्रशांत दामलेंची जीवलग मित्रासाठी निशब्द करणारी FB पोस्ट

खुद्द समांथालाही वाटले नव्हते की तिचे गाणे इतके हिट होईल म्हणून. तिच्या गाण्याला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून समांथा स्वत:च भांबावली. एकदा बोलताना तिने सांगितले की, ‘ Oo Antava’या गाण्याला इतका प्रचंड प्रतिसाद मिळेल असे वाटले नव्हते. मी अजिबात अपेक्षित केले नव्हते. संपूर्ण भारतात हे गाणे प्रचंड गाजले. केवळ तेलुगु प्रेक्षकच नाही तर देशभरातील विविध भाषिक लोकांना हे गाणे आवडले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी