आऊट की नॉट आऊट? ऋषभ पंतच्या कॅचने झाला हंगामा

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 05, 2022 | 18:47 IST | टाइम्स नाऊ मराठी

India vs South Africa 2nd test, Rishabh Pant catch controversy: जोहान्सबर्ग कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी वेन डुसेनची ऋषभ पंतने विकेटच्या मागे कॅच घेतला. यावरून आता वाद सुरू झाला आहे.

pant catch
आऊट की नॉट आऊट? ऋषभ पंतच्या कॅचने झाला हंगामा 
थोडं पण कामाचं
  • भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या कसोची झाला वाद़
  • जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्या दिवशी घेतला ऋषभ पंतने कॅच
  • आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर आणि टीम मॅनेजर अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यास पोहोचले. 

मुंबई: द. आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर(south africa captain dean elgar) आणि टीम मॅनेजर खोमोत्सो भारताविरुद्धच्या(india vs south africa second test) दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी लंचच्या वेळेस मॅच अधिकाऱ्यांना भेटले आणि रेसी वान डेर डुसेच्या विकेटकीपरच्या हाती  बाद झाल्याबाबत संशयास्पद निर्णयावर चर्चा केली. ईएसपीएनक्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार एल्गर आणि मासुबेलेले वान डेर दुसेच्या विकेवरून मैदानावरील अंपायर मरायस इरासमस आणि अलाहुद्दीन पालेकर, तिसरा अंपायर अॅड्रियन होल्डस्टॉक आणि मॅच रेफ्री अँडी पायक्रॉफ्ट  यांच्याशी चर्चा करायची होती. हे स्पष्ट झाले नाही की यांच्यात काय चर्चा झाली. out or not out? rishabh pant catch is in controversy

मैदानावरील अंपायरने लंचआधी शार्दूल ठाकूरच्या बॉलवर वान डेर दुसेला विकेटमागे कॅच आऊट दिले होते. मात्र विकेटकीपर ऋषभ पंतने घेतलेल्या या विकेटच्या वैधतेवरून वाद सुरू झाला होता. दरम्यान कोणतेही स्पष्ट साक्ष मिळाली नाही की बॉल पंतच्या ग्लव्ह्जमध्ये जाण्याआधी जमिनीला टेकला. 

पाहा व्हिडिओ

आयसीसीच्या नियम २.१२नुसार मैदानावरील अंपायरचा निर्णय बदलण्यासाठी स्पष्ट साक्ष्यची गरज असते. यानुसार अंपायर कोणताही निर्णय बदलू सकात. याशिवाय अन्य स्थितीत अंपायरचा निर्णय अंतिम असतो. 

द. आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात भारताचा दुसरा डाव २६६ धावांवर आटोपला. त्यांनी द. आफ्रिकेला २४० धावांचे लक्ष्य दिले आहे. भारताच्या दुसऱ्या डावात अजिंक्य रहाणेने ५८ धावांची खेळी केली. तर चेतेश्वर पुजारा ५३ धावा करू शकला. हनुमा विहारीने ४० धावांची खेळी करत मोलाचे योगदान दिले. इतर कोणत्याही खेळाडूला चांगली खेळी करता आली नाही. हनुमा विहारीला दुखापतग्रस्त विराट कोहलीच्या जागी सामील करण्यात आले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी