मुंबई: टी-20 वर्ल्डकप 2022च्या(t20 world cup 2022) पराभवानंतर भारतीय क्रिकेट मंडळाने(bcci) अनेक मोठी पावले उचलली आहेत. या स्पर्धेत टीम इंडियाला(team india) सेमीफायनलमध्ये(semifinal) इंग्लंडविरुद्ध(england) पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवानंतर बीसीसीआयने चेतन शर्माच्या(chetan sharma) नेतृत्वातील सिलेक्शन कमिटी आधीच हटवली आहे. आता बीसीसीआयने आणखी एक मोठी कारवाई करताना एका दिग्गजाची टीम इंडियातून सुट्टी केली आहे. paddy-upton contrach will not renewed by bcci
अधिक वाचा - गुणरत्न सदावर्तेंवर फेकली काळी पावडर
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने टी-20 वर्ल्डकप 2022मधील पराभवानंतर मेंटल कंडिशनींग कोच पॅडी अॅप्टनला हटवण्याचा विचार केला आहे. इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार बीसीसीआय आता द. आफ्रिकेचे राहणारे पॅडी अॅप्टन यांचे कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करत नाही आहेत. टी-20 वर्ल्डकप 2022 सह पॅडी अॅप्टन यांचे बीसीसीआयसोबतचे कॉन्ट्रॅक्ट संपले आहे.
53 वर्षीय पॅडी अॅप्टन यांना टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड यांच्या सल्ल्यानंतर मेंटल कंडिशनिंग कोच बनवण्यात आले होते. ते या वर्षी जुलैमध्ये टीम इंडियासोबत जोडले गेले होते. याआधी पॅडी अॅप्टन 2008-11 दरम्यानच्या कार्यकाळात मेंटल कंडिशनिंग कोच आणि रणनीती कोच या दुहेरी भूमिकेत काम केले आहे.
पॅडी अॅप्टन यांनी आयपीएलमध्ये राहुल द्रविडसोबत राजस्थान रॉयल्ससाठी काम केले आहे. पॅडी अॅप्टनने पुणे वॉरियर्स, राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली डेअरडेविल्ससोबत मुख्य कोच म्हणून काम केले होते. तर पाकिस्तान सुपर लीग मध्ये लाहोर कलंदर्स आणि बिग बॅश लीगमध्ये सिडनी थंडरलाही कोचिंग दिले आहे.
अधिक वाचा - प्रेमविवाह होत नाहीये? 'हा' मंत्र करेल तुमची मदत
टीम इंडिया सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या टीम इंडियात युवा क्रिकेटर आहेत. यात टी-20 मालिकेदरम्यान हार्दिक पांड्याने संघाचे नेतृत्व केले होते. तर वनडे सामन्यात शिखर धवन मालिकेचे नेतृत्व करत आहे.