T20 World Cup: पेट्रोल महाग झाल्याने जनरेटर नाही चालला, पाकिस्तानच्या पराभवानंतर संघाची खिल्ली

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Oct 21, 2021 | 13:34 IST | टाइम्स नाऊ मराठी

टी-२० वर्ल्डकपमदील आपल्या दुसऱ्या वॉर्म अ सामन्यात पाकिस्तानला दक्षिण आफ्रिकेकडून ६ विकेटनी पराभवाचा सामना करावा लागला. बुधवारच्या सामन्यात पाकिस्तानने ६ बाद १८६ धावा केल्या होत्या. 

pak
T20 World Cup: पेट्रोल महाग झाल्याने जनरेटर नाही चालला 
थोडं पण कामाचं
  • पाकिस्तानचा दक्षिण आफ्रिकेकडून पराभव
  • २४ ऑक्टोबरला होणार भारत-पाक सामना

मुंबई: टी-२० वर्ल्डकपमधील आपल्या दुसऱ्या वॉर्म अप सामन्यात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला ६ विकेटनी मात दिली. बुधवारी पाकिस्तान आणि आफ्रिका यांच्यातील सामन्यात पाकिस्तानने ६ बाद १८६ धावा केल्या होत्या. मात्र आफ्रिकेच्या टीमने २० ओव्हरमध्ये ४ बाद १९० धावा करत हा सामना जिंकला. 

आफ्रिकेच्या विजयाचा हिरो ठरला रासी वान डुर हुसेन. याने नाबाद १०१ धावांची खेळी केली. पाकिस्तानच्या पराभवात त्यांच्या गोलंदाजांची कामगिरी सुमार राहिली. अंतिम ओव्हरमध्ये आफ्रिकेला १९ धावा बनवायच्या होत्या. मात्र हसन अली आपल्या संघासाठी इतके रन डिफेंड करू शकले नाहीत. अलीने चार ओव्हरमध्ये ५२  धावा दिल्या.

पाकिस्तानने आपल्या पहिल्या सराव सामन्यात वेस्ट इंडिजला ७ विकेटनी हरवले होते. आता पाकिस्तानचा संघ आपल्या पहिल्या सामन्यात २४ ऑक्टोबरला भारताशी दोन हात करणार आहे. आपल्या दोन्ही वॉर्मअप सामन्यात विजय मिळवणाऱ्या भारताचे पारडे पाकिस्तानपेक्षा ज आहे.

दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानी चाहत्यांनी संघाची खिल्ली उडवण्यास सुरूवात केली आहे. एकाने हसनअलीचा फोटो शेअर करत ट्वीट केले की पेट्रोल महाग झाल्याने ते आज जनरेटर चालवू शकले नाहीत. 

तर आणखी एका युजरने लिहिले की, जर पाकिस्तानला भारताविरुद्ध विजय मिळवायचा असेल तर त्यांना कोणत्याही शंकेशिवाय टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी निवडावी लागेल. आपली डेथ गोलंदाजी खराब आहे आणि ते लक्ष्याचा पाठलाग करण्यास पटाईत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी