Pak vs Eng Final: टी20 विश्वचषकातील अंतिम सामन्यात होणार कमाल, विजयी होतील दोन्ही संघ?

ऑस्ट्रेलियन हवामान अंदाज (Australian weather forecast) विभागानुसार, रविवारी मेलबर्नमध्ये 100% आणि रिझर्व्ह डेला म्हणजे सोमवारी 95% पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. तर वाऱ्याचा वेग ताशी 35 किलोमीटरपेक्षा जास्त असू शकतो. परिणामी Pak- Eng चा सामना रद्द होण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे.

Will both teams win the T20 World Cup final?
टी20 विश्वचषकातील अंतिम सामन्यात दोन्ही संघ होतील विजयी?   |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • दोन दिवस मेलबर्नमध्ये पावसाचा अंदाज आहे.
  • सामना रद्द झाला तर इंग्लंड-पाकिस्तानला ट्रॉफी शेअर करावी लागणार
  • आज (13 नोव्हेंबर) मेलबर्नमध्ये कमाल तापमान 26 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 15 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज

T20 World Cup 2022 Final, PAK vs ENG:  T-20 विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी, 13 नोव्हेंबर रोजी पाकिस्तान आणि इंग्लंड (Pak-Eng) यांच्यात मेलबर्नमध्ये खेळवला जाणार आहे. यंदाच्या विश्वचषक विजेतेपदासाठी पाकिस्तान आणि इंग्लंड संघ अंतिम फेरीत आमने-सामने आले आहेत.  परंतु या सामन्यावर पावसाचा धोका निर्माण झाला आहे. या विश्वचषकाचे अनेक सामने पावसामुळे रद्द करावे लागले असल्याने फायनलमध्येही पावसाची पूर्ण शक्यता आहे. (Pak vs Eng Final: T20 World Cup final match will be maximum, both teams will win?)

अधिक वाचा  : प्रेषित मोहम्मद अवमान प्रकरण: विद्यार्थ्याला नग्न करत मारहाण

ऑस्ट्रेलियन हवामान अंदाज (Australian weather forecast) विभागानुसार, रविवारी मेलबर्नमध्ये 100% आणि रिझर्व्ह डेला म्हणजे सोमवारी 95% पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. तर वाऱ्याचा वेग ताशी 35 किलोमीटरपेक्षा जास्त असू शकतो. परिणामी Pak- Eng चा सामना रद्द होण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे.  दोन दिवस मेलबर्नमध्ये पावसाचा अंदाज आहे.  दोन्ही दिवशी पावसाचा अंदाज खरा ठरल्यास अंतिम फेरी रद्द करण्यात येऊ शकतो. सामना रद्द झाला तर इंग्लंड-पाकिस्तानला ट्रॉफी शेअर करावी लागणार आहे. दुसऱ्या शब्दांत, पाकिस्तान आणि इंग्लंड यांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल.   

अधिक वाचा  : चाणक्याच्या या नीतिचा जीवनात करा अवलंब मिळेल श्रीमंती

राखीव दिवशीही अंतिम सामना होणे अशक्य

आज (13 नोव्हेंबर) मेलबर्नमध्ये कमाल तापमान  26  अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 15 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. तर 82% ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. येथे वाऱ्याचा वेग 35 किमी/ताशी असेल. तसे, अंतिम सामन्यासाठी राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे. म्हणजेच आज सामना झाला नाही तर तो उद्या (14 नोव्हेंबर) पूर्ण होईल. मात्र त्या दिवशीही 94 टक्के पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत हा सामना पूर्णपणे रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

अधिक वाचा  : सानिया मिर्झाचा होता शाहीद कपूरवर क्रश

कोणताही संघ जिंकला तरी त्यांचे दोन्ही संघ विजयी

या अंतिम सामन्यात विजेतेपद कोणताही संघ जिंकेल, त्याचे हे दुसरे T20 विश्वचषक विजेतेपद असेल. याआधी 2009 आणि त्यानंतर लगेचच 2010 मध्ये पाकिस्तानने टी-20 विश्वचषक जिंकला होता. यावेळी इंग्लंडचा संघ फेव्हरेट मानला जात आहे. पण पाकिस्तानही कमकुवत संघ नाही. इंग्लंडने उपांत्य फेरीत टीम इंडियाचा पराभव केला. तर पाकिस्तानने न्यूझीलंडचा पराभव केला आहे. 

पाऊस पडला तर करावं लागेल हे काम 

पावसामुळे सामना रद्द झाल्यास पाकिस्तान आणि इंग्लंड संघ ही ट्रॉफी शेअर करावे. यामुळे पाकिस्तान आणि इंग्लंड यांना संयुक्त विजेता घोषित केले जाणार. मात्र, हा सामना छोटा असला तरी बघायला मिळेल, अशी आशा चाहत्यांना आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी