India vs Pak: १४ वर्षांचा इतिहास आहे साक्षीला, वर्ल्डकपमध्ये जेव्हा भारत-पाकिस्तान भिडले...

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Oct 21, 2021 | 12:32 IST | टाइम्स नाऊ मराठी

भारत आणि पाकिस्तान गेल्या ९ वर्षात ५ वेळा भिडले आणि पाचही वेळा पाकिस्तानला पराभवाचे पाणी पाजावे लागले. पुन्हा एकदा टी-२० वर्ल्डकपमध्ये दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. याआधी पाचवेळा हे संघ आमनेसामने आले होते. 

ind vs pak
१४ वर्षांचा इतिहास,वर्ल्डकपमध्ये जेव्हा भारत-पाकिस्तान भिडले 
थोडं पण कामाचं
  • भारत आणि पाकिस्तान गेल्या ९ वर्षात ५ वेळा भिडले आणि पाचही वेळा पाकिस्तानला पराभवाचे पाणी पाजावे लागले
  • २००७मध्ये टी-२० वर्ल्डकपचा पहिला हंगाम खेळवण्यात आला होता.
  • २००७ वर्ल्डकपमध्ये भारत-पाकिस्तान अंतिम फेरीत खेळले होते.

मुंबई: टी-२० वर्ल्डकपमध्ये दोन कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान गेल्या ९ वर्षात ५ वेळा भिडले आणि पाचही वेळा पाकिस्तानला पराभवाचे पाणी पाजावे लागले. पुन्हा एकदा टी-२० वर्ल्डकपमध्ये दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. याआधी पाचवेळा हे संघ आमनेसामने आले होते. 

पहिला सामना- भारत वि पाकिस्तान १४ सप्टेंबर २००७ डर्बन

२००७मध्ये टी-२० वर्ल्डकपचा पहिला हंगाम खेळवण्यात आला होता. भारत आणि पाकिस्तान या वर्ल्डकपमध्ये एकच ग्रुपमद्ये होते. दोन्ही संघादरम्यानचा सामना काँटे की टक्कर झाला होता. टीम इंडियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना १४१ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने तितक्याच धावा केल्या  आणि सामना टाय झाला. यानंतर बॉल आऊटने निकाल लागला. भारताकडून तीन थ्रो झाले. हे तीन थ्रो वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग आणि रॉबिन उथप्पाने केले. भारताचे तीनही थ्रो विकेटवर लागले. पाकिस्तानकडूनही तीन थ्रो करण्यात आले. मात्र त्यांचा एकही थ्रो विकेटवर लागला नाही. आणि टीम इंडिया हा सामना जिंकली. 

दुसरा सामना - भारत वि पाकिस्तान २४ सप्टेंबर २००७ जोहान्सबर्ग

ग्रुप सामन्यानंतर दोन्ही संघाचा सामना पुन्हा फायनलमध्ये झाला. सामन्यात टॉस जिंकत भारताने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाचा सलामी फलंदाज गौतम गंभीरने ५४ चेंडूवर ७५ धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीदरम्यान ८ चौकार आणि दोन षटकार ठोकले. याशिवाय रोहित शर्माने १६ चेंडूत ३० धावांची तुफानी खेळी केली. भारतान २० षटकांत ५ विकेट गमावत १५७ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरूवात खराब झाली. पाकिस्तानने ७७ धावांत ६ विकेट गमावल्या. मात्र मिसबाहने सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत नेला. मिसबाह ४३ धावा करून बाद झाला आणि भारताने हा सामना ५ धावांनी जिंकला. यासोबतच भारताने हा सामना जिंकला आणि वर्ल्डकपही. 

तिसरा सामना - ३० सप्टेंबर २०१२ कोलंबो

२०१२च्या टी-२० वर्ल्डकपचे आयोजन श्रीलंकेत झाले होते. टीम इंडियासाठी हा सामना एकतर्फी झाला. पहिल्यांदा फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ १२८ धावांवर आटोपला.  सामन्यात लक्ष्मीपती बालाजीने कमालीची गोलंदाजी केली. त्याने पाक संघाला ३ झटके दिले. टीम इंडियाकडून विराट कोहलीने आपल्या फलंदाजीची जादू दाखवली. त्याने ६१ चेंडूत ७८ धावा केल्या. त्याला मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार देण्यात आला. भारताने हा सामना ८ विकेटनी आपल्या नावे केला. 

चौथा सामना - भारत वि पाकिस्तान ढाका २१ मार्च २०१४

भारतासाठी हा सामनाही एकदम सोपा होता. पाकिस्तानने पहिल्यांदा फलदाजी केली आणि २० ओव्हरमध्ये १३० धावा केल्या. अमित मिश्राने शानदार गोलंदाजी केली. त्याने २२ धावांत दोन विकेट मिळवल्या. कोहली पुन्हा एकदा संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. त्याने ३२ चेंडूत ३६ धावांची खेळी केली. 

पाचवा सामना - भारत वि पाकिस्तान १९ मार्च २०१६ कोलकाता

२०१६च्या वर्ल्डकपमद्ये भारत-पाकिस्तानचा सामना कोलकातामध्ये खेळवण्यात आला. पुन्हा एकदा पाकिस्तानच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी केली आणि ते पुन्हा घसरले. त्यांनी २० ओव्हरमध्ये केवळ ११८ धावा केल्या. दरम्यान टीम इंडिया फलंदाजीसाठी आली तेव्हा सुरूवातीला त्यांना झटके बसले. मात्र विराट कोहलीने ३७ चेंडूत ५५ धावा करत पुन्हा एकदा पाकिस्तानचे विजयाचे स्वप्न धुळीस मिळवले. टीम इंडियानेहा सामना ६ विकेटनी जिंकला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी