T-20 world cup 2022:फायनलमध्ये पाकिस्तानची एंट्री, न्यूझीलंडला हरवले

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 10, 2022 | 11:27 IST | टाइम्स नाऊ मराठी

T-20 world cup 2022च्या सेमीफायनलमध्ये धमाकेदार कामगिरी करत संघाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. 

Pak vs nz
T-20 world cup 2022: फायनलमध्ये पाकिस्तानची एंट्री 
थोडं पण कामाचं
  • पाकिस्तानचा न्यूझीलंडवर जबरदस्त विजय
  • पाकिस्तानने 5 चेंडू राखत पूर्ण केले लक्ष्य
  • न्यूझीलंडने केल्या होत्या 152 धावा

मुंबई: T-20 world cup 2022च्या फायनलमध्ये पाकिस्तान संघाने शानदार एंट्री केली आहे. त्यांनी सेमीफायनलमध्ये न्यूझीलंड संघाला हरवत फायनलमध्ये मजल मारली आहे. विजयासाठी153 धावांचे लक्ष्य पाकिस्तान संघाने 3 विकेट गमावत आणि 5 चेंडू राखत पूर्ण केले. Pakistan beat new zealand and enter in final of T-20 world cup 2022

अधिक वाचा - India vs England Live Score, T20 World Cup Semi Final: भारत वि. इंग्लंड सेमीफायनल थोड्याच वेळात

विजयासाठी 153 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानच्या सलामीवीरांनी धमाकेदार सुरूवात केली. पाकिस्तानचा सलामीीीर मोहम्मद रिझवानने 57 धावांची खेळी केली. तर कर्णधार बाबर आझमने 53 धावा केल्या. दोघांनीही अर्धशतके ठोकली. यामुळे पाकिस्तानला भक्कम पाया रचता आला. 

तत्पूर्वी, न्यूझीलंड संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 4 बाद 152 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडकडून डॅरी मिचेलने सर्वाधिक नाबाद 53 धावा केल्या तर कर्णधार केन विल्यमसन्सने 46 धावांची खेळी केली. न्यूझीलंडची सलामीची जोडी तितकी काही कमाल कामगिरी करू शकली नाही. सलामीवीर डेवॉन कॉनवेने 21 धावा केल्या. तर फिन अॅलेन केवळ 4 धावा करून बाद झाला. न्यूझीलंडच्या जेम्स नीशामला 16 धावाच करता आल्या. पाकिस्तानकडून शाहीन शाह आफ्रिदीने 2 विकेट मिळवल्या. तर मोहम्मद नवाजला एक विकेट मिळवण्यात यश मिळाले. 

अधिक वाचा - मुंबई-गोवा महामार्गासाठी पत्रकार रस्त्यावर, चक्काजाम आंदोलन

फायनलमध्ये भारत की इंग्लंड

आता या विजयी संघाला भारत आणि इंग्लंड यांच्यातील विजेत्याशी फायनलमध्ये भिडावे लागणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात 10 नोव्हेंबरला सेमीफायनलचा दुसरा सामना रंगणार आहे. त्यामुळे आता यांच्यातील विजेत्या संघाला फायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळावे लागेल. 

2021च्या वर्ल्डकपमध्येही गाठली होती सेमीफायनल

पाकिस्तान संघाने 2021च्या वर्ल्डकपमध्येही सेमीफायनल गाठली होती. मात्र त्यांना सेमीफायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. कधी काय कुठे कोणता निकाल लागेल हे सांगता येत नाही. पाकिस्तान संघाने याआधी एकदा टी20 वर्ल्डकपचा खिताब जिंकलेला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी